लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणांचा समावेश असलेला हंगामी अर्थसंकल्प मांडल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मंगळवारी फेटाळली. अत्यंत अवघड परिस्थितीतून यूपीए सरकारने देशाची अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर आणली असल्याचे चिदंबरम यांनी स्पष्ट केले.
अर्थही हंगामीच..
चिदंबरम यांनी सोमवारी लोकसभेमध्ये पुढील आर्थिक वर्षासाठी हंगामी अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंक ल्पातील तरतुदींवरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ लोकप्रिय घोषणांचा समावेश असलेला हा अर्थसंकल्प आहे. त्यामध्ये मध्यमवर्गीय आणि उत्पादकांना खूष करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची टीका करण्यात आली. त्याला चिदंबरम यांनी उत्तर दिले.
ते म्हणाले, जागतिक मंदीचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसू नये, यासाठी गेल्या काही अर्थसंकल्पांत केंद्र सरकार सर्वोतोपरी काळजी घेत होती. इतर देशांच्या अर्थसंकल्पातही याच पद्धतीने काळजी घेण्यात आली. एकूण जगाची आर्थिक स्थिती विचारात घेता यूपीए सरकारने २०१३ मध्ये मांडलेला अर्थसंकल्प आणि आता सादर करण्यात आलेला हंगामी अर्थसंकल्प यातून देशाच्या अर्थव्यवस्थेला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येते.
अर्थमंत्र्यांचे मतानुदान!
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱया तिमाहीत विकासदर ५.२ टक्क्यांपर्यंत असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पहिल्या तिमाहीत विकासदर ४.४ टक्के होता. दुसऱया तिमाहीत तो ४.८ टक्क्यांपर्यंत पोहोचला, याकडे चिदंबरम यांनी लक्ष वेधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा