सोन्यात गुंतवणूक करू नका, असा सल्ला बॅंकांनी त्यांच्या ग्राहकांना दिला पाहिजे, असे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गुरुवारी सांगितले. सोन्याची आय़ात कमी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अर्थमंत्र्यांनी आता बॅंकांनीच या कामात पुढाकार घेण्याचे सुचविले आहे. देशात सध्या प्रतिमहिना सरासरी १५२ टन सोन्याची आयात केली जाते. सोन्याच्या आयातीचे इतके प्रमाण अर्थव्यवस्थेला पूरक नसल्याने आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया प्रयत्नशील आहे. 
देशांतर्गत सोनेखरेदी कमी करण्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने गेल्या मंगळवारी सोन्याची आयात करणाऱया विविध एजन्सींवर निर्बंध घातले. याआधी बॅंकांकडून होणाऱय़ा सोन्याच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आले होते. तेच निर्बंध आता विविध खासगी एजन्सी, ट्रेडिंग हाऊस यांनाही लागू करण्याचा निर्णय बॅंकेने घेतला. १३ मे रोजी रिझर्व्ह बॅंकेने परिपत्रक काढून बॅंकांकडून होणाऱया सोन्याच्या आयातीवर निर्बंध घातले होते. त्याच निर्बंधांची व्याप्ती मंगळवारी आणखी वाढविण्यात आली.

Story img Loader