माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने आयएनएक्स मीडिया काळा पैसा प्रकरणात जाबजबाब घेतले. इंडिया गेट येथील जामनगर हाऊस कार्यालयात ते सकाळी सव्वा अकरा वाजता वकिलासह उपस्थित होते. या प्रकरणात चिदंबरम यांचे सक्तवसुली संचालनालयाने जाबजबाब घेण्याची ही पहिलीच वेळ होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सूत्रांनी सांगितले, की पीएमएलए कायद्यानुसार चिदंबरम यांना चौकशी अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी बुधवारी पाचारण केले होते. एअरसेल मॅक्सिस प्रकरणात त्यांचे यापूर्वी जाबजबाब घेण्यात आले होते. गेल्या महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयाने आयएनएक्स मीडिया प्रकरणात सक्तवसुली  संचालनालय व सीबीआय यांनी दाखल केलेल्या खटल्यात अटकेपासूनचे संरक्षण १५ जानेवारीपर्यंत वाढवून दिले होते.

न्यायालयाने चिदंबरम यांना चौकशीत सहकार्य करण्याचा आदेशही दिला होता. यापूर्वी आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांचे जाबजबाब घेण्यात आले होते. त्यांची भारत व परदेशातील ५४ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने सीबीआयच्या प्राथमिक माहिती अहवालानुसार त्यांच्यावर पीएमएलए खटला दाखल केला आहे.

आयएनएक्स मीडियाला चिदंबरम हे अर्थमंत्री असताना २००७ मध्ये ३०५ कोटी रुपये घेण्याची परवानगी देण्यात आली होती. सक्तवसुली संचालनालयाने दाखल केलेल्या अहवालानुसार कार्ती चिदंबरम व पीटर तसेच इंद्राणी मुखर्जी यांची नावे आहेत. कार्ती चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी २८ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. नंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले.