51st Chief Justice of India Sanjiv Khanna Oath: भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पदाचा कार्यकाळ नुकताच संपुष्टात आला. त्याआधीच न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे पुढचे सरन्यायाधीश होतील हे निश्चित झालं होतं. त्यानुसार आज संजीव खन्ना यांनी भारताच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली होती. १० नोव्हेंबर २०२४ हा त्यांच्या सरन्यायाधीशपदाचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे धनंजय चंद्रचूड बरोबर दोन वर्षांसाठी सरन्यायाधीशपदी होते. पण संजीव खन्ना यांना मात्र फक्त ६ सरन्यायाधीशपदी फक्त सहा महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे.

१३ मे २०२५ सेवेचा शेवेटचा दिवस!

सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ आजपासून सुरू झाला असला, तरी त्यांना धनंजय चंद्रचूड यांच्याप्रमाणे दोन वर्षं मिळणार नसून फक्त सहा महिनेच त्यांना या पदावर राहता येणार आहे. १३ मे २०२५ हा संजीव खन्ना यांच्या सेवेचा शेवटचा दिवस असणार आहे. त्या दिवशी ते निवृत्त होणार असल्यामुळे सरन्यायाधीश म्हणूनदेखील त्यांना फक्त १३ मे पर्यंतच पदावर राहता येणार आहे. परिणामी त्यांना सहा महिनेच या पदावर राहता येणार आहे. याआधी न्यायमूर्ती उदय लळित यांना जवळपास अडीच महिन्यांसाठीच सरन्यायाधीशपदी नियुक्त करण्यात आलं होतं.

High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या... (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP President Election : भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या…
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
ghatkopar billboard collapse case, High Court,
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेचा जामीन रद्द करा, सत्र न्यायालयाच्या आदेशाला सरकारचे उच्च न्यायालयात आव्हान
Why Siraj Get Heavier Penalty Than Head after Adelaide Controversy
Siraj-Head Fight: मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडपेक्षा ICCने जास्त शिक्षा का ठोठावली? काय आहे नेमकं कारण?
BRS Ex MLA Chennamaneni Ramesh
BRS Ex MLA Chennamaneni Ramesh: जर्मन असूनही चार वेळा भूषविली आमदारकी; उच्च न्यायालयाकडून लाखोंचा दंड, भारतीय नागरिकत्वही झाले रद्द
Revenue Secretary Sanjay Malhotra to be the new RBI Governor for a period of 3 years!
RBI Governer : संजय मल्होत्रा आरबीआयचे नवे गव्हर्नर, पुढील तीन वर्षे असेल कार्यकाळ

सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा जीवनप्रवास व कारकीर्द

१४ मे १९६० रोजी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा जन्म झाला. १९८३ मध्ये अर्थात २४व्या वर्षी दिल्ली बार कौन्सिलमध्ये त्यांनी वकील म्हणून नोंदणी केली. २००४ साली दिल्ली एनसीआरसाठी स्टँडिंग कौन्सिल (सिव्हिल) म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळायला सुरुवात केली. पुढच्याच वर्षी म्हणजे २००५ साली त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून बढती झाली. एका वर्षाच्या आतच ते दिल्ली उच्च न्यायालयात पूर्णवेळ न्यायमूर्ती म्हणून काम पाहू लागले.

Justice Sanjiv Khanna: कलम ३७० ते निवडणूक रोख्यांवर बंदी; हे ऐतिहासिक निकाल देणारे न्यायमूर्ती संजीव खन्ना कोण आहेत? खुद्द न्या. चंद्रचूड यांनी दाखविला विश्वास

१३ वर्षं दिल्ली उच्च न्यायालयात सेवा दिल्यानंतर १८ जानेवारी २०१९ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून काम करताना या काळात त्यांनी १७ जून ते २५ डिसेंबर २०२३ दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या विधिविषयक समितीचे चेअरमन म्हणूनही जबाबदारी सांभाळली. सरन्यायाधीशपदासोबतच आता न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्याकडे नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटीचे कार्यकारी प्रमुख व भोपाळमधील नॅशनल ज्युडिशियल अकॅडेमीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य या अतिरिक्त जबाबदाऱ्यादेखील आहेत.

सरन्यायाधीश निवडीचा निकष काय सांगतो?

सर्वोच्च न्यायालयाच्या कलोजियमद्वारे सरन्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत प्रस्तावाधारित निर्णय घेतले जातात. त्यात सेवाज्येष्ठतेबरोबरच संबंधित न्यायमूर्तींची कारकिर्द व इतर बाबींचाही विचार केला जातो. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाची प्रकरणं यशस्वीरीत्या हाताळली आहेत. त्यामुळे त्यांची यशस्वी कारकीर्द व सेवाज्येष्ठता या दोन्ही गोष्टींचा विचार करूनच संजीव खन्ना यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला व त्याला मंजुरी देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

Story img Loader