पीटीआय, भोपाळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपण मध्य प्रदेशातील राजकारणाची व्याख्या बदलली असा दावा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या बुधनी विधानसभा मतदारसंघामधील लाडकुई येथे एका कार्यक्रमात केला. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या महिलांना उद्देशून त्यांनी भावनिक आवाहन केले. मी नसेन तेव्हा तुम्हाला माझी आठवण येईल असे ते म्हणाले.

मध्य प्रदेशात या वर्षांच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. लाडकुई येथे बोलताना चौहान म्हणाले की, ‘मी मध्य प्रदेशातील राजकारणाची व्याख्या बदलली आहे. तुम्ही अनेक वर्षे काँग्रेसची सत्ता पाहिली. तुम्ही कधी त्यांना लोकांची चिंता करताना पाहिले का’? ‘मी नसताना तुम्हाला माझी आठवण येईल’ असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा>>>Nobel Prize: करोना लसी संशोधनासाठी वैद्यकशास्त्रातील नोबेलची घोषणा; करिको व वेसमन यांची नावं जाहीर!

मात्र, शिवराज सिंह चौहान हे खोटे बोलणे आणि खोटी आश्वासने देणे यासाठी लक्षात राहतील अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी केली. तर चौहान यांचे विधान आणि सद्य परिस्थितीवरून त्यांची गच्छंती अटळ आहे असे दिसते, अशी टीका काँग्रेसचे अन्य नेते अरुण यादव यांनी केली.

ग्वाल्हेर येथे  सोमवारी विकासकामांच्या  उद्घाटन कार्यक्रमाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी,  मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नागरिकांना अभिवादन केले. 