१५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी माहिती दिली होती. याबाबतील आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या वयोगटातील मुलांना १ जानेवारीपासून लसीकरणासाठी कोविनवर नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती कोविनचे प्रमुख डॉ. आर एस शर्मा यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुले १ जानेवारीपासून CoWIN अॅपवर लसीसाठी नोंदणी करू शकतील. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने सोमवारी सकाळी सांगितले की मुले नोंदणी करण्यासाठी त्यांचं शाळेचं ओळखपत्र वापरू शकतात. कोविनचे प्रमुख डॉ. आर एस शर्मा यांनी सांगितले की, कोविनवर नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी ओळखपत्र वापरण्याची वापरण्याची परवानगी दिली आहे. कारण काही मुलांकडे आधार कार्ड नसण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा: Children Covid Vaccination: १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी ‘अशी’ करा नोंदणी; जाणून घ्या प्रक्रिया)

पंतप्रधान मोदींनी शनिवारी केली होती घोषणा..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची घोषणा शनिवारी केली. तसेच आरोग्य सेवेतील आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांबरोबरच ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना वर्धक लसमात्रा (बूस्टर डोस) देण्याचेही मोदी यांनी जाहीर केले होते. येत्या जानेवारीपासून देशाच्या लसीकरण कार्यक्रमाचा विस्तार करून त्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात येईल. या किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा प्रारंभ ३ जानेवारीपासून होईल, असे मोदी यांनी नमूद केले. तसेच आरोग्य सेवा आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांसह ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १० जानेवारीपासून वर्धक लसमात्रा देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले होते.

(हे ही वाचा: Booster Dose: ६० वर्षावरील नागरिकांना मिळणार बूस्टर डोस; लसीकरणासाठी ‘अशी’ करा नोंदणी; जाणून घ्या प्रक्रिया)

१५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण सोमवार, ३ जानेवारीपासून सुरू करण्यात येईल. या निर्णयामुळे करोना विरोधातील लढाई आणखी मजबूत होईल, असं मोदी म्हणाले होते.