टर्कीनंतर आता चीन आणि ताजिकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूंकपाची तीव्रता अनुक्रमे ७.३ आणि ६.८ रिश्टर स्केल मोजण्यात आली आहे. यूएस जिऑलिजकल सर्वेनुसार गुरुवारी सकाळच्या सुमारास हे भूकंप झाले.
हेही वाचा – लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी घडलं विपरीत, रिसेप्शनची तयारी सुरू असताना नवविवाहित जोडपं आढळलं रक्ताच्या थारोळ्यात
चीनच्या मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ८.३० च्या सुमारास चीन-ताजिकिस्तानच्या सीमेजवळ असणाऱ्या झिजियांग प्रांतात भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ७.३ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. या भूकंपाचे केंद्र चीन सीमेपासून ८२ किमी दूर होते. याबरोबरच उइगर प्रांतातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
चीनबरोबरच ताजिकिस्तानमध्येही गुरुवारी पहाटे ५.३० च्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. यूएस जिऑलिजकल डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली.