चीनमधील शिनजिआंग प्रांतामध्ये मुस्लीम नावांवर बंदी घालण्यात आली आहे. नव्या नियमानुसार चीनमधील मुस्लीम विगूर या वंशाच्या अल्पसंख्यांक लोकांना यापुढे आपल्या धर्म आणि संस्कृतीप्रमाणे आपल्या मुलांचे नामकरण करता येणार नाही असे सांगण्यात आले आहे. चीनच्या शनिजिआंग प्रांतात मुस्लिमांवर कठोर निर्बंध घातले जात असल्याचा दावा ह्युमन राइट्स वॉच या संस्थेनी केला आहे. चीनने काही नावांची यादी केली आहे. या यादीतील नावांवर बंदी घालण्यात आली आहे. सद्दाम, मिदिना या सारख्या नावांवर बंदी घालण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जर मुलांची नावे अशी असतील त्यांना रहिवासी प्रमाणपत्र मिळणार नाही असे सांगण्यात आले आहे. जर रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर लहान मुलांना शाळेतील शिक्षण किंवा वैद्यकीय सुविधांपासून दूर राहावे लागेल. जहालवाद फोफावू नये म्हणून चीनने या प्रांतातील मुस्लीमांवर अनेक निर्बंध लादले आहेत. त्यापैकीच हे काही निर्बंध असल्याचे ह्युमन राइट्स वॉचने म्हटले आहे. याबरोबरच ‘विचित्र दाढी’ ठेवता येणार नाही, बुरखा घालता येणार नाही असे देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर सरकारने टीव्हीवर दाखवलेले कार्यक्रम पाहणे टाळले तरी तुम्हाला शिक्षा होऊ शकेल असे निर्बंध या ठिकाणी लादण्यात आले आहेत. चीनमधील बहुसंख्यांक हान आणि उगूर या दोन वंशांमध्ये नेहमीच तणावाचे वातावरण असते. गेल्या काही वर्षांपासून या प्रांतात होणाऱ्या संघर्षाच्या घटनांची संख्या वाढली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China bans muslim names like saddam jihad for newborns in xinjiang