चीनच्या युनान भागातील कुनामिंग या रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री चाकूधारी हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात ३३ जण ठार झाले तर १३० लोक जखमी झाले आहेत.
चीनमधील एका स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनूसार, काही जमावाने रेल्वे स्टेशनमधील प्रवाशांवर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात ३३ प्रवशांना आपला जीव गमवावा लागला. चाकू हल्ल्याबरोबरच स्टेशन परिसरात फायरींगचा आवाजही ऐकू आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जमावावर हल्ला करणारे सर्वच्या सर्व हल्लेखोर पोलिसांकडून मारले गेले असल्याचे एका चीनी वृत्तवाहिनीने म्हटले आहे. अचानक प्रवशांवर करण्यात आलेल्या हल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून स्टेशन परिसरात अक्षरश: मृतांचा सडा पाहायला मिळाला. हल्लेखोरांनी कशासाठी हा हल्ला घडवून आणला याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत असून चीनमध्ये अनेक दिवसापासून अशा प्रका-या होणा-या हल्ल्यामध्ये वाढ झाली आहे.
चीनच्या संसद अधिवेशनाच्या आठवडाभर आधी हा संशयित दहशतवादी हल्ला झाला. या हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नसून, ते वायव्यवेकडील झिनजियांग प्रांतातील असण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. वायव्य भागात “अल्‌ कायदा’शी निगडित पूर्व तुर्कस्तान इस्लामिक मूव्हमेंट हा दहशतवादी गट सक्रिय आहे. उघीर मुस्लिम आणि हान वंशीय चिनी नागरिक यांच्यात अनेक वर्षे संघर्ष सुरू आहे. गेल्या वर्षी तियानमेन चौकात पूर्व तुर्कस्तान इस्लामिक मूव्हमेंट या संघटनेने केलेल्या हल्ल्यात ३ जण ठार झाले होते.

Story img Loader