चीनला बनावट पत्रकारांच्या समस्येने ग्रासले असून देशभरातील १४, ४५५ जणांची ‘पत्रकार ओळखपत्रे’ चीनने रद्द केली आहेत. बनावट पत्रकारांविषयी येणाऱ्या तक्रारींमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे, बेकायदेशीरपणे चालविल्या जाणाऱ्या २१६ वृत्तपत्रांची तपासणी सरकारतर्फे करण्यात आली. त्यापैकी, ७६ वृत्तपत्रांवर बंदी घालण्यात आली आहे.
झिनुआ या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील १५ लाख बेकायदेशीर वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांची चौकशी करण्यात आली असून, २५८ प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच पीपल्स डेली, झिनुआ वृत्तसंस्था, चायना सेंट्रल टेलिव्हिजन, चायना एज्युकेशन डेली आणि महत्त्वाच्या नभोवाणी केंद्रांनी आपल्या पत्रकारांना अद्ययावत प्रशिक्षण द्यावे, तसेच अंतर्गत व्यवस्थापनाचा दर्जा सुधारावा, अशी सूचना चिनी सरकारने जारी केली आहे.
चीनमध्ये बोगस पत्रकारांचा सुळसुळाट
चीनला बनावट पत्रकारांच्या समस्येने ग्रासले असून देशभरातील १४, ४५५ जणांची ‘पत्रकार ओळखपत्रे’ चीनने रद्द केली आहेत.
First published on: 24-04-2014 at 03:59 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China cancels over 14400 press cards for journalists