काळय़ा धुक्यामुळे महामार्गावर वाहतूककोंडी
पॅरिसमध्ये जागतिक हवामान परिषद सुरू असताना चीनमध्ये आज काळय़ा धुक्यामुळे किमान २०० द्रुतगती महामार्गावर वाहतूककोंडी निर्माण झाली होती. शँडाँग प्रांतात आज सकाळी पीत इशारा (यलो अ‍ॅलर्ट) देण्यात आला होता, त्यामुळे २०० मीटरखालच्या अंतरावरचे काही दिसत नाही.
सकाळी मोठय़ा प्रमाणात काळे धुके जमा झाले होते, असे हवामान केंद्राने सांगितले आहे. श्वसनाचे रोग असलेल्या लोकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घरात बसण्यास सांगितले आहे.
पॅरिस येथे हवामान परिषद सुरू असतानाच चीनमध्ये ही दारुण अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे धोक्याचा इशारा देण्यात आला. पर्यावरणमंत्री शेन जिनिंग यांनी काल असा दावा केला होता, की चीनमधील प्रमुख प्रदूषकांचे प्रमाण कमी करण्यात यश आले आहे. हवामान परिषदेच्या एख दिवस आधी त्यांनी हा दावा केला. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे हवामान परिषदेसाठी पॅरिसला गेले असून, विकसित व विकसनशील देशात या कराराबाबत मतभेद आहेत.
चीन हा अमेरिकेबरोबरच मोठा प्रदूषक देश असून, दोन्ही देशांमध्ये हरितगृह वायू कमी करण्याबाबत वेगळा करार झाला होता. उत्तर चीनमध्ये बीजिंग, तियानजिन, हेबेई, हेनान, शँगडाँग, शांक्सी प्रांतात काळय़ा धुक्याने आकाश वेढले आहे.

Story img Loader