हस्तिदंताच्या व्यापारावर कायद्याने बंदी असूनही आजही हजारोच्या संख्येने हत्तींची कत्तल केली जाते. या पाश्र्वभूमीवर हस्तिदंतांच्या अनैतिक व्यापाराची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचा शिक्का पुसण्यासाठी तसेच वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी चीनने तब्बल ६.१ टन हस्तिदंताचा साठा सार्वजनिक ठिकाणी नष्ट केला.
दक्षिण चीनमधील गुआंगडाँग प्रांतातील डाँगगुआन शहरात चीन प्रशासनाने नुकताच सार्वजनिक ठिकाणी मोठय़ा प्रमाणाात हस्तिदंतांचा साठा उद्ध्वस्त केला. या प्रांतात मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीररीत्या हस्तिदंतांचा व्यापार केला जातो. हस्तिदंतांसाठी मोठय़ा प्रमाणात हत्तींची कत्तल केली जाते. या पाश्र्वभूमीवर वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी तसेच त्याबाबत जनमानसात जनजागृती करण्यासाठी चीन प्रशासनाने प्रथमच एवढय़ा व्यापक प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी हस्तिदंताचा साठा नष्ट करण्याचा निर्णय घेतल्याचे क्झिनुआ या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
१९८९ मध्ये जागतिक पातळीवर हस्तिदंताच्या व्यापारावर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही बेकायदेशीर मार्गाने हस्तिदंताचा व्यापार सुरूच राहिला आहे. त्यासाठी आफ्रिकेत दररोज सुमारे ९६ हत्तींची निर्घृणपणे हत्या केली जात असल्याची धक्कादायक माहिती वन्यजीव संवर्धन संस्थेच्या वतीने देण्यात आली. हस्तिदंतासाठी दरवर्षी तब्बल ३० ते ३५ हजार हत्ती मारले जातात. हस्तिदंताच्या या बेकायदेशीर व्यापारात वर्षांकाठी तब्बल ८.७ अब्ज ते १० अब्ज डॉलरची उलाढाल होत असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा