चीनच्या संरक्षण वैज्ञानिकांनी जगातील सर्वात वेगवान महासंगणक तयार केला असून त्याची किमान क्षमता सेकंदाला ३३.८६ क्वाड्रिलियन इतक्या आकडेमोडी करण्याची आहे. चीनच्या या तियानहे २ या महासंगणकाने आता अमेरिकेच्या टायटन या महासंगणकाला मागे टाकले आहे. तियानहे २ या महासंगणकाची किंमत १० कोटी अमेरिकी डॉलर इतर असून त्याची कमाल क्षमता सेकंदाला ५४.९ क्वाड्रिलियन आकडेमोडी इतकी आहे, असे नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी या संस्थेने दिली आहे.
या महासंगणकाच्या आधीच्या पिढीतला तियानहे १ ए हा नोव्हेंबर २०१० ते जून २०११ या काळात जगातील सर्वात वेगवान महासंगणक होता, त्याने त्यावेळी जपानच्या ‘के’ या महासंगणकाला मागे टाकले होते.तियानहे २ किंवा मिल्की वे २ हा महासंगणक ग्वांगझो येथील नॅशनल सुपरकॉम्प्युटर सेंटर या ठिकाणी तो ठेवण्यात आला आहे. जगातील पहिल्या पाचशे संगणकांच्या यादीत या महासंगणकाने अव्वल स्थान मिळवल्यावर एकच जल्लोष करण्यात आला.
तियानहे २ ला १६००० नोड्स आहेत, त्या प्रत्येकाला दोन आयव्हीब्रिज प्रोसेसर व तीन झेऑन फी प्रोसेसर आहेत. त्याला एकूण ३१२०००० कोअर आहेत. महासंगणक तियानहे २ हा सेकंदाला ३३.८६ पेटाफ्लॉप गणने करू शकतो. टायटन हा अमेरिकी ऊर्जा विभागाच्या ओक रीज नॅशनल लॅबोरेटरीतील महासंगणक दुसऱ्या स्थानावर गेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा