चीनने ग्वादार बंदराच्या संरक्षणासाठी पाकिस्तानला २ जहाजे दिली आहेत. बलुचिस्तानमधील महत्त्वपूर्ण ग्वादार बंदर आणि चीन-पाकिस्तानमधील इकॉनॉर्मिक कॉरिडॉरच्या अंतर्गत येणाऱ्या व्यापारी मार्गांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानच्या नौदलाला चीनकडून दोन जहाजे देण्यात आली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये चीनकडून कोट्यवधींची गुंतवणूक करण्यात आली आहे. चीन आणि पाकिस्तानच्या दृष्टीने हा इकॉनॉमिक कॉरिडॉर अतिशय महत्त्वाचा आहे. याच इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या संरक्षणसाठी चीनने पाकिस्तानच्या नौदलाला दोन जहाजे दिली आहेत. शनिवारी चीनकडून दोन जहाजे पाकिस्तानला सोपवण्यात आली आहेत. पाकिस्तानमधील अशांत भाग असणाऱ्या बलुचिस्तान प्रांतात ग्वादार बंदर विकसित करण्यात आले आहे. इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत या बंदराचा विकसित करण्यात आला आहे. या बंदरातून निघणारा मार्ग पाकिस्तान, पश्चिम आशिया, आफ्रिकेतून जात पश्चिम चीनला युरोपशी जोडतो.

चीनने हिंगोल आणि बासोल ही दोन जहाजे पाकिस्तानच्या नौदलाला सोपवली आहेत. पाकिस्तानचे वरिष्ठ अधिकारी वाईस एडमिरल आरिफुल्ला हुसैनी यांच्याकडे चीनकडून सुपूर्द करण्यात आली. नुकतीच चीनकडून उभारण्यात आलेली ही जहाजे आता पाकिस्तानच्या नौसेनेचा भाग असणार आहेत. या जहाजांचा वापर अरबी समुद्राच्या संरक्षणासाठी केला जाणार आहे.

चीनकडून दोन जहाजे पाकिस्तानला सोपवण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा यंत्रणेचे महासंचालक रियर ऍडमिरल जमील अख्तर, कमांडर (पश्चिम) मोहम्मद वारिस आणि पाकिस्तानी नौदलाचे अनेक वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. याशिवाय चीनच्या अनेक अधिकाऱ्यांचीदेखील या समारंभाला उपस्थिती होती. ‘चीनकडून देण्यात आलेली दोन जहाजे आज पाकिस्तानी नौदलाचा भाग बनत आहेत. या जहाजांमुळे पाकिस्तानचे नौदल आणखी भक्कम होईल,’ असे यावेळी वाईस ऍडमिरल हुसैनी यांनी म्हटले.