चीनच्या वुहानमधून करोनाचा उगम झाल्यानंतर व्हायरसनं संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतलं. करोनामुळे अनेक जणांना आपल्या जीवाला मुकावं लागलं. तर काही जण अनेक दिवसांच्या उपचारानंतर करोनातून बरे झाले. त्यामुळे अनेक देशांनी करोनाचा फैलाव रोखण्यासाठी कडक पावलं उचलली आहे. अशातच चीनमध्ये तीन पाळीव मांजरींना प्रशासनाने मारल्याची घटना समोर आली आहे. चीनच्या हार्बिन शहरातील घटना असून त्या मांजरींना करोनाची लागण झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. चीन करोनाचा फैलाव रोखण्यासाठी कठोर पावलं उचलत आहे.

चीनच्या हार्बिनमध्ये आतापर्यंत ७५ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रशासनाने या भागात कडक अमलबजावणी करण्यास सुरुवात केली होती. यात २१ सप्टेंबरला तीन मांजरींना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर मांजरी अन्न पाणी देऊन त्यांना आयसोलेशनमध्ये सोडण्यात आलं होतं. यानंतर एका सामाजिक कार्यकर्त्यांने तिन्ही मांजरींची पुन्हा करोना चाचणी केली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मांजरींना मारण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला. या प्रस्तावाला मांजरींच्या मालकाने विरोध दर्शवत ऑनलाइन अपिल केली होती. मात्र प्रशासनाने काही न ऐकता तिन्ही मांजरींना मारलं. “तिन्ही मांजरींना यासाठी मारलं कारण, प्राण्यांचे करोनावरील उपचार उपलब्ध नाहीत. करोनाबाधित मांजरी मालक आणि इमारतीत राहण्याऱ्या अन्य लोकांसाठी धोकादायक ठरत होत्या”, असं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं.

मित्रांसोबत मद्यपान केलं अन् बेपत्ता झाला ! पोलिसांचा शोध सुरू असताना…

प्राण्यांना करोनाची लागण होण्याचा धोका कमी आहे, असं यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेशननं सांगितलं आहे. मात्र प्राण्यांकडून माणसांना करोनाचं लागण होण्याचा धोका अधिक आहे. असं असलं तरी याबाबतचे कोणतेच पुरावे नसल्याचं सीडीसीने सांगितलं आहे

Story img Loader