पाकिस्तानातील ग्वादार बंदराच्या विकासासाठी चीन अर्थपुरवठा करीत असून भविष्यात या बंदराचा वापर लष्करी वापरासाठी होऊ शकतो, असे संरक्षणमंत्री ए. के. अॅण्टनी बुधवारी राज्यसभेत सांगितले.
ग्वादार बंदराबाबतच्या घडामोडींवर सरकारचे बारकाईने लक्ष असून या बंदराचा ताबा एका चिनी कंपनीला देण्यात येणार असल्याच्या वृत्ताबाबतही भारत दक्ष आहे. भविष्यात या बंदराचा लष्करी कारवायांसाठी वापर होऊ शकतो. याबाबत भारताने यापूर्वीच चिंता व्यक्त केली असून चीन आता पाकिस्तानच्या विनंतीवरून या बंदराचे बांधकाम करीत आहे. ही चिंतेची बाब आहे असे सरळ आणि स्पष्ट आपले उत्तर असल्याचेही अॅण्टनी यांनी या वेळी सांगितले. भारतीय सागरी क्षेत्रात चीनच्या कारवाया वाढल्या आहेत का, असे विचारले असता संरक्षणमंत्री म्हणाले की, बंदरांचा विकास, खोल समुद्रात खाणकाम, सागरी संशोधन आणि चाचेविरोधी कारवायांमध्ये चीन सहभागी होऊ लागली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा