चीनने पुढील आर्थिक वर्षासाठी आपल्या संरक्षण दलावरील खर्चामध्ये १०.७ टक्क्यांनी वाढ केलीये. चीनमध्ये संरक्षण दलांसाठी ११५.७ अब्ज डॉलरची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. भारताने आपल्या संरक्षण दलांसाठी अर्थसंकल्पात ३७.४ अब्ज डॉलरची तरतूद केली आहे. त्यापार्श्वभूमीवर चीनने केलेल्या तरतुदीमुळे संरक्षणविषयक अभ्यासकांचे लक्ष त्याकडे वेधले गेले आहे.
चीनमधील नॅशनल पीपल कॉंग्रेसच्या वार्षिक अधिवेशनला मंगळवारी सुरुवात झाली. त्यामध्ये संरक्षण दलांसाठीच्या तरतुदीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिवेशनता सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार संरक्षण दलांसाठी अर्थसंकल्पात ७२०.१६८ अब्ज युआनची तरतूद करण्यात आलीये. चीनमध्ये दर दहा वर्षांनी सत्ताबदल होतो. याच वर्षी चीनचे माजी अध्यक्ष हू जिंताओ यांच्याकडून एक जिंनपिंग यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर पहिल्यांदाच नॅशनल पीपल कॉंग्रेसच्या अधिवेशनात नव्या सत्ताधाऱयांकडून अर्थसंकल्प मांडण्यात आला.
चीनचे मावळते पंतप्रधान वेन जिआबाओ यांनी अर्थसंकल्पीय तरतूदींचे वाचन केले. त्याचबरोबर त्यांनी गेल्या दहा वर्षांतील कामकाजाचे अहवाल वाचनही केले. गेल्या वर्षी चीनने संरक्षण दलांसाठी १०६.४ अब्ज डॉलरची अर्थसंकल्पात तरतूद केली होती. जगातील एखाद्या देशाने संरक्षण दलांसाठी केलेली ती सर्वांत मोठी तरतूद ठरली होती.

Story img Loader