भारत, चीन व पाकिस्तान या तिन्ही देशांच्या अण्वस्त्रसाठ्यात गेल्या वर्षभरात प्रत्येकी  दहा अण्वस्त्रांची भर पडल्याचा दावा स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने(एसआयपीआरआय) केला आहे. चीनची अण्वस्त्रसंख्या २४० वरुन २५० वर गेली असून भारत आणि पाकिस्तान यांच्याही अण्वस्त्र साठ्यामध्ये गेल्या  वर्षात प्रत्येकी १० अण्वस्त्रांची वाढ झाली असल्याचेही ‘एसआय़पीआरआय’ने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.
‘एसआयपीआरआय’ संस्थेतील संशोधक पिल्लीप शेल यांच्यानुसार चीनच्या अण्वस्त्रसाठ्यात वाढ होत असून, चीनचे सध्याचे अण्वस्त्रांमध्ये वाढ करण्याचे धोरण कायम राहणार असल्याचे आढळले आहे.

‘स्टार्ट'(START) करारानुसार २०१० साली करारबद्ध झालेल्या अमेरिका, रशिया यांनी आपल्या अण्वस्त्रसाठ्यात कपात केली आहे. त्यानुसार याआधी अमेरिकेची अण्वस्त्र संख्या ८००० इतकी होती. ती आता ७,७०० इतकी झाली आहे, तर रशियाची अण्वस्त्र संख्या १०,००० वरून ८,५०० इतकी झाली आहे.

Story img Loader