राजधानी बिजिंग ते दक्षिणेकडील गुआंगझोऊ शहराला जोडणाऱ्या जगातील सर्वाधिक लांबीच्या बुलेट ट्रेनचे चीनने बुधवारी उद्घाटन केले. ताशी ३०० किमी वेगाने धावणारी ही बुलेट ट्रेन बिजिंग ते गुआंगझोऊ दरम्यानचे दोन हजार २९८ किमीचे अंतर अवघ्या आठ तासांत पार करणार आहे.
बिजिंग ते गुआंगझोऊदरम्यानचे अंतर कापण्यासाठी यापूर्वी २० तास लागत होते. मात्र आज सुरू झालेल्या अतिवेगवान बुलेट ट्रेनमुळे हे अंतर अवघ्या आठ तासांत पार करता येणार असून १२ तास वाचणार आहेत. या नव्या रेल्वेमार्गामुळे चीनमधील हायस्पीड रेल्वेचे जाळे आता ९ हजार ३०० किमी इतके झाले आहे.
गेल्या वर्षी चीनने बिजिंग-शांघायदरम्यान १३०० किमी अंतराचा हायस्पीड रेल्वे मार्ग उभारला होता. या हायस्पीड रेल्वे मार्गामुळे या दोन शहरांमधील अंतर अवघ्या पाच तासांत पार करणे शक्य झाले आहे. मात्र आता नव्याने सुरू झालेला बििजग ते गुआंगझोऊ हा मार्ग चीनमधीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक लांबीचा हायस्पीड रेल्वेमार्ग ठरला आहे. या रेल्वेमार्गामुळे बिजिंग शहर देशातील गुआंगडोंग प्रांतातील इतर औद्योगिक शहरांशी जोडले गेले आहे. हा हायस्पीड रेल्वेमार्ग २०१५ पर्यंत थेट हाँगकाँगपर्यंत जोडला जाणार आहे.
ताशी ३५० किमी वेगाने धावू शकेल अशा या हायस्पीड बुलेट ट्रेनला देशातील पाच प्रांतांमधील ३५ मोठय़ा शहरांमध्ये थांबे देण्यात आलेले आहेत. रेल्वे मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी झाओ चूनलेई यांनी सांगितले की, या हायस्पीड गाडीच्या तिकिटाचा दर प्रवाशांना हव्या असलेल्या सोयीसुविधांनुसार असणार आहे.
चीनमध्ये जगातील सर्वाधिक लांबीची बुलेट ट्रेन
राजधानी बिजिंग ते दक्षिणेकडील गुआंगझोऊ शहराला जोडणाऱ्या जगातील सर्वाधिक लांबीच्या बुलेट ट्रेनचे चीनने बुधवारी उद्घाटन केले. ताशी ३०० किमी वेगाने धावणारी ही बुलेट ट्रेन बिजिंग ते गुआंगझोऊ दरम्यानचे दोन हजार २९८ किमीचे अंतर अवघ्या आठ तासांत पार करणार आहे.
First published on: 26-12-2012 at 05:40 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China launches worlds longest bullet train service