मॅकडोनाल्ड, केएफसी, स्टारबक व पिझा हट या फास्ट फूड कंपन्यांची प्रतिष्ठा चीनमधील काही विक्री केंद्रात सडलेले मांस विक्रीस ठेवण्याच्या प्रकरणात धुळीला मिळाली आहे. फास्ट फूड दुकानात सडलेले मांस विक्रीस ठेवल्याचे तपासात दिसून आल्याचे चीनचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांनी मांसाचे आक्षेपार्ह पदार्थ जप्त केले असून त्यात मॅकडोनाल्ड, केएफसी यांचा समावेश आहे. त्यांचा एक विक्रेता सडलेले मांस विकत असल्याची तक्रार आल्यावरून अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
टोकियो येथे मॅकडोनल्डने असे सांगितले की, आम्ही एक पंचमांश चिकन मॅकनगेट शांघाय हुसी येथूनच घेतो व आता त्याची विक्री थांबवण्यात येत आहे. थायलंड व चीन या देशातून मॅकडोनाल्ड कंपनी चिकन घेत होती. स्थानिक टीव्ही वृत्त कार्यक्रमात रविवारी शांघाय हुसी कंपनी लि. च्या युनिटशी संबंधित बातमी दाखवण्यात आली. त्यांनी सदोष व शिळे मांस फास्ट फूम्ड कंपन्या व चीनमधील रेस्टॉरंटला विकल्याचे त्यात सांगण्यात आले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी शांघाय हुसी येथील उत्पादन बंद केले, प्रत्यक्षात ती अमेरिकेच्या ओएसआय समूहाने चालवलेली कंपनी आहे.  
शिचुआन प्रांताची राजधानी असलेल्या चेंगडू येथे हुसीची ९.६ टन उत्पादने सीलबंद करण्यात आली. मॅकडोनल्ड, केएफसी व तैवानाच्या तिंग हिसिन समूहाचे डिकॉस (चिनी फास्टफूड समूह) यांच्यावर कारवाई करण्यात आली. हांगझाऊ येथे झेजियांग या ठिकाणी १.७७ टन मांस व ६ टन चिकन सील करण्यात आले. केएफसी, पिझ्झा हट यांनी वेगळ्या ब्रँड नावाने आणलेले डुकराच्या मांसाचे पदार्थ व मॅकडोनाल्डचे असेच अन्नपदार्थ सील करण्यात आले. अमेरिकेने गुंतवणूक केलेल्या सर्व अन्न उद्योगांची तपासणी चिनी अधिकारी करणार आहेत.

Story img Loader