पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अस्थिर अशा जागतिक वातावरणात सरकार, खासगी क्षेत्र, अभ्यासगट, संशोधन संस्था यांच्यात उत्तम समन्वय साधून केलेले प्रयत्न हे देशाला जगाचे उत्पादन केंद्र म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी महत्त्वाच्या आहेत, असे आर्थिक पाहणी अहवालाने नमूद केले आहे.

जागतिक उत्पादनाचे मोठे केंद्र म्हणून चीनची वाढणारी क्षमता, तिचा इतर देशांच्या महत्त्वाकांक्षांवर होणाऱ्या परिणामांचे आव्हान आहे. याबरोबरच ऊर्जा संक्रमणासाठीचे आवश्यक साहित्य, खनिजे, यंत्रे आदींच्या पुरवठ्यावर असलेल्या चीनच्या वाढत्या मक्तेदारीचा अहवालात उल्लेख आहे. या अशा स्थितीत भारतापुढे एका बाजूला मोठी आर्थिक आव्हाने आणि दुसऱ्या बाजूला खूप संधी असे हे चित्र आहे, असेही अहवालाने म्हटले आहे.

जागतिक उत्पादनामध्ये चीन अग्रस्थानी आहे. त्याचा या देशाला सामरिक फायदाही होत आहे. त्याचा उपयोग स्पर्धात्मकता आणि आर्थिक धोरणांच्या माध्यमातून प्रमुख संसाधनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी होताना दिसत आहे. जागतिक पुरवठा साखळीच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे. त्यामुळे अस्थिर जागतिक वातावरणात सर्व स्तरांतून समन्वय साधून प्रयत्न करण्याची गरज आहे. यात सरकारी क्षेत्र, खासगी क्षेत्र, वित्तीय संस्था यांनी उत्तम समन्वय साधून प्रयत्न करायला हवेत.

चीनवर मोठे अवलंबित्व

भारतीय उत्पादक हे चीनकडून ७५ टक्के लिथियम आयन बॅटरी घेतात. सौर ऊर्जेत, पोलिसिलिकॉन, वेफर यांसारख्या महत्त्वाच्या घटकांचे उत्पादन जवळजवळ शून्य आहे. आज जग ऊर्जा संक्रमणासाठी चीनवर अवलंबून आहे. भारताची ऊर्जा क्षेत्रातील उद्दिष्टे पाहता आणि चीननिर्मित वस्तूंवर अवलंबित्व उत्तरोत्तर कमी करण्याचे भारतापुढे मोठे आव्हान आहे. उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजनेंतर्गत (पीएलआय) स्थानिक स्तरावरील उत्पादनाचे प्रयत्न वाढील लागायला हवेत.