बीजिंगमधील तिएनानमेन चौकात करण्यात आलेला हल्ला दहशतवादी होता आणि तो इस्लामी दहशतवाद्याने पत्नी आणि आईच्या मदतीने घडवून आणला होता. चीनच्या पोलिसांनी बुधवारी या प्रकरणी पाच जणांना अटक केली. बीजिंगमधील हा पहिलाच मोठा दहशतवादी हल्ला
आहे. बीजिंग पोलिसांनी चीनच्या झिनजिआंग प्रांतातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने पाच संशयितांना अटक केल्यानंतर या प्रकरणाचे काही धागेदोरे हाती आले आहेत. झिनजिआंग प्रांत हा अफगाणिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या सीमेवर आहे.तिएनानमेन चौकात मोटर दुर्घटना घडली, त्याभोवतीचे गूढ अधिकाधिक गडद होत चालले आहे. हा हल्ला काळजीपूर्वक नियोजन केलेला आणि पूर्वनियोजित होता, असे बीजिंगमधील अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader