चीनपुढे सध्या अनेक जोखीम आणि आव्हाने आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी अनेक क्षेत्रांमधील सुधारणांबाबत अधिक वेळ दडवणे आता चीनला परवडणारे नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान पदाचे उमेदवार लि केकियांग यांनी शुक्रवारी केले.
सध्या चीनमध्ये दशकातील नेतृत्वबदलाची प्रक्रीया सुरु आहे. कम्युनिस्ट पक्षाचे ५७ वर्षीय लि केकियांग सध्या उपपंतप्रधान असून नेतृत्वबदलाच्या प्रक्रीयेत लवकरच ते वेन जिआबो यांच्याकडून पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
गुरुवारी कॉंग्रेसच्या बैठकीत राष्ट्रपती हु जिंतोओ यांनी केलेल्या भाषणानंतर आज आयोजित चर्चेदरम्यान अर्थशास्रातील डॉक्टरेट पदवी प्राप्त केलेले लि केकियांग यांनी चीनसमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय याबाबत आपले मत मांडले.
चीन सध्या विकासाच्या वाटेवर स्वार झाला असून देशापुढे असंख्य आव्हाने आणि जोखमीची परिस्थिती आहे. देशात खोलवर सुधारणा घडवूनआणण्यासाठी देशाच्या साम्यवादी अर्थव्यवस्था गतीशील करण्याची गरज आहे. त्यासाठी आर्थिक धोरणांमध्ये मोठय़ा प्रमाणात बदलाची गरज आवश्यकता असल्याचेही लि  केकियांग यांनी सांगितले.
गेल्या दशकभरात चीनने सुधारणांबाबत ऐतिहासिक यश मिळवले असून देशाला आधुनिकतेचा चेहरा मिळवून देताना साम्यवादाची योग्य सांगड घालत विकासाच्या मार्गावर घोडदौड सुरु केली आहे. तसेच आगामी काळात कमी वेळेत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी सर्व प्रतिनिधींनी विज्ञानाची कास धरून पुढे जाण्याची गरज असल्याचे लि केकियांग यांनी सांगितले.

Story img Loader