बीजिंग/वेनचांग : चंद्राच्या अतिदूरच्या (अंधाऱ्या) बाजूतील नमुने गोळा करून ते वैज्ञानिक अभ्यासासाठी पृथ्वीवर आणणारी चीनची ५३ दिवसांची ‘चांग-ई-६’ ही चंद्र तपासणी मोहीम शुक्रवारपासून सुरू झाली. चीनच्या दक्षिणेकडील हैनान किनाऱ्यावरील ‘वेनचांग’ अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून ‘लाँग मार्च-५ वाय रॉकेट’द्वारे ही मोहीम यशस्वी प्रक्षेपित झाल्याचे अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मानवाच्या चंद्र संशोधन मोहिमेचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचे चीनच्या राष्ट्रीय अंतराळ प्रशासनाने (सीएनएसए) म्हटले आहे. ‘चांग-ई-६’ मोहिमेत ऑर्बिटर, लँडर, एसेंडर आणि री-एंट्री मॉडय़ूल आदी चार घटक समाविष्ट केले आहेत. चंद्रावरील धूळ आणि खडक गोळा केल्यानंतर एसेंडर हे नमुने चंद्राच्या परिभ्रमण कक्षेत री-एंट्री मॉडय़ूलमध्ये हस्तांतरित करण्यासाठी पाठवेल, जे त्यांना पृथ्वीवर परत घेऊन जाईल.

हेही वाचा >>> ‘बीएनएस’मध्ये बदलांचा विचार करावा! महिलांविरुद्ध क्रौर्यावरून सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना

चांग-ई-६च्या लँडरवर इटली, फ्रान्स, आणि स्वीडनची वैज्ञानिक उपकरणे असतील, विशेष म्हणजे ऑर्बिटरमध्ये पाकिस्तानच्या ‘पेलोड’चाही समावेश आहे. चीनने पहिल्यांदाच पाकिस्तानचे ऑर्बिटर आपल्या चंद्र मोहिमेत समाविष्ट केले आहे. ‘आयक्यूब-क्यू’ हा कृत्रिम उपग्रह शांघाय विद्यापीठ एसजेटीयू आणि ‘सुपार्को’ या पाकिस्तानी अंतराळ संस्थेच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे.

मोहिमेचे पौराणिक नाव

‘चांग’ हे नाव चीनच्या पौराणिक चंद्रदेवीवरून ठेवण्यात आले आहे. ‘चांग-ई-५’ने चंद्राच्या बाजूचे नमुने गोळा करून आणले आहेत.  त्याचे विश्लेषण केल्यानंतर चंद्रावर पाणी आढळले. भविष्यात चंद्रावर केंद्र उभारण्याची चीनची योजना आहे. चीनने यापूर्वी लँडिंग रोव्हरसह चंद्रावर मानवरहित मोहीम यशस्वी केल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China successfully launches chang e 6 probe to study dark side of the moon zws