गेल्या काही काळात भारतासह जगभरात करोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आला आहे. मात्र, चीनमध्ये अद्याप करोना विषाणूचं थैमान सुरू आहे. येथे दररोज हजारो करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना चीनमधील नागरिकांमध्ये सरकार आणि करोना धोरण राबवणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात असंतोष निर्माण होत आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून चिनी सरकारच्या करोना धोरणावर टीका करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर चीनने सरकारच्या कोविड धोरणावर टीका करणाऱ्या एक हजाराहून अधिक सोशल मीडिया खात्यांवर कारवाई केली असून संबंधित खाती निलंबित अथवा बंद केली आहेत. यातील बऱ्याच खात्यांना लाखो फोलोअर्स आहेत. चीनमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo ने आपल्या निवेदनात म्हटलं की, चीनमधील कोविड तज्ज्ञांवर वैयक्तिक टीका करणारे अकाऊंट्स निलंबित किंवा बंद केले आहेत. पण नेमक्या कोणत्या पोस्टमुळे ही कारवाई करण्यात आली, याबाबत Weibo कोणताही खुलासा केला नाही.
हेही वाचा- चीनमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ; बीजिंगमध्ये रुग्णशय्या उपलब्ध नाहीत
चीन सरकारने डिसेंबरमध्ये ‘शून्य-कोविड धोरण’ रद्द केले. हे कठोर धोरण रद्द करताचा करोना संक्रमण आणि मृतांची झपाट्याने वाढली. यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर सरकारच्या कोविड धोरणाविरोधात आवाज उठवला. कोविड नियमांच्या कठोर अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
काही नेटकऱ्यांनी कोविड तज्ज्ञांवरही निशाणा साधला. जे तज्ज्ञ काही आठवड्यांपूर्वी सरकारच्या कठोर करोना निर्बंधांचं समर्थन करत होते. तेच तज्ज्ञ आता अचानक सरकारच्य ‘झिरो कोविड धोरण’ रद्द करण्याच्या निर्णयाचा बचाव करत आहेत, असा दावा नेटकऱ्यांकडून केला जात आहे. यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo ने एक हजार १२० सोशल मीडिया खात्यांवर तात्पुरती किंवा कायमची बंदी घातली आहे. याबाबतचं वृत्त ‘बीबीसी’ने दिलं आहे.