करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनने देशाच्या पश्चिमेकडील शीआन शहरामध्ये कठोर निर्बंध लागू केलेत. धक्कादायक बाब म्हणजेच आता या शहरामधील नागरिकांना अन्न धान्यांची टंचाई जाणवू लागली असून दोन वेळेच्या जेवणासाठी आता येथील नागरिकांना कसरत करावी लागतेय. निर्बंधांमुळे येथील नागरिकांवर आता घरातील वस्तूंच्या मोबदल्यात भाज्या आणि अन्न धान्य घेण्याची वेळ आलीय. आपल्या घरातील वस्तू इतरांना देऊन त्या मोबदल्यात त्यांच्याकडील अन्नांची देवणघेवाण शीआनवासियांनी सुरु केल्याचा दावा सोशल मीडियावरुन करण्यात येतोय. विशेष म्हणजे अन्नासाठी लोक त्यांच्याकडील गॅजेट्सही देत असल्याची माहिती समोर येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एक कोटी ३० लाख लोक घरात अडकून पडले…
वुहानमध्ये दोन वर्षांपूर्वी करोनाचा सर्वात आधी प्रादुर्भाव झालेला त्यावेळी घेण्यात आलेल्या कठोर निर्णयांनंतरचा हा सर्वात मोठा निर्णय म्हणून शीआन लॉकडाउनकडे पाहिलं जात आहे.आपल्या झीरो टॉलरन्स ध्येयाचा उल्लेख करत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध आवश्यक असल्याचं सांगत चीनने २३ डिसेंबरपासून शीआनमध्ये लॉकडाउनची घोषणा केलीय. शीआन शहरातील नागरिकांना घरीच थांबण्याचे आदेश देण्यात आलेत. तसेच आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी घरातील एकाच व्यक्तीला दिवसाआड बाहेर पडण्याची मूभा देण्यात आलीय. या शहरामध्ये एक कोटी ३० लाख लोक राहतात. पण मागील दोन आठवड्यांपासून लॉकडाउन असल्याने आता शहरामध्ये अन्नाचा तुटवडा जाणवू लागलाय.
प्रशासनाचा दावा विरुद्ध वास्तूस्थिती…
स्थानिक प्रशासनाकडून सर्व नागरिकांना घरपोच अन्न धान्य पुरवण्यात येत असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र अनेकांनी सोशल मीडियावरुन आपल्या घरामध्ये अन्न तुवडा असल्याचं सांगत आपल्याला घरातील वस्तूंच्या मोदबल्यात अन्न घ्यावं लागत असल्याच्या तक्रारी केल्यात.
नक्की पाहा हे फोटो >> Photos: ‘या’ देशांमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळला नाही; यादीतील शेवटचे दोन देश पाहून आश्चर्य वाटेल
सॅनिटरी पॅड्सच्या मोबदल्यात भाज्या
ट्विटरप्रमाणेच चीनमध्ये लोकप्रिय असणाऱ्या विबो या सोशल नेटवर्किंग साईट्सवरील व्हायरल व्हिडीओ आणि फोटोंमध्ये शीआनमधील लोक सिगारेटच्या मोबदल्यात कोबी, डिश वॉशरच्या मोबदल्यात सफरचंद आणि सॅनिटरी पॅड्सच्या मोबदल्यात भाज्यांची देवणघेवाण करताना दिसत आहेत.
नक्की वाचा >> लोकसत्ता विश्लेषण: ‘फ्लोरोना’ म्हणजे काय? संसर्गाचा सर्वाधिक धोका कोणाला? लक्षणं कोणती? उपचार काय?
तांदळाच्या मोबदल्यात स्मार्टफोन
एका व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण त्याच्याकडील व्हिडीओ गेमचा निनटॅण्डो कंपनीचा कन्सोल इन्स्टंट न्यूडल्स आणि स्टीम बन्सच्या मोबदल्यात देण्यास तयार असल्याचं सांगतोय. “लोकांकडे आता खाण्यासाठी अन्नधान्य नाहीय. त्यामुळेच अनेकजण आपआपल्या इमारतींमधील व्यक्तींसोबत वस्तूंची देवाणघेवाण करत आहेत,” असं रेडिओ फ्री एशियासोबत बोलताना वँग नावाच्या व्यक्तीने सांगितलं आहे. येथील काही लोक तांदळाच्या मोबदल्यात स्मार्टफोन आणि टॅबलेट देण्यासही तयार असल्याची माहिती रेडिओ फ्री एशियाने दिलीय.
नक्की वाचा >> Omicron चा संसर्गच ठरतोय नैसर्गिक लस?; साथरोग तज्ज्ञ, संशोधक म्हणतात, “एकदा संसर्ग होऊन गेल्यानंतर…”
काय वेळ आलीय…
कोणताही आधार नसल्याने नागरिकांना वस्तूंच्या मोबदल्यात वस्तूंची देवणघेवाण करावी लागतेय. कापसाच्या गोळे देऊन बटाटे घेण्याची वेळ काहींवर आलीय, असं विबोवर एकाने म्हटल्याचा उल्लेख बीबीसीच्या बातमीत आहेत. तर अन्य एकाने आपण पुन्हा पुरातन पद्धतीचा समाज व्यवस्थेमध्ये आल्याची टीका याच माध्यमावरुन केलीय.
नक्की पाहा >> Omicron: लस घेतलेल्यांनाही संसर्ग, प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाऐवजी…; WHO ने मांडलेले १८ मुद्दे
चीनला चिंता विंटर गेम्सची…
चीनमधील सरकारी वृत्तसंस्था असणाऱ्या सिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार नाताळाआधी मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात येत असून या चाचण्यांच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये १४ जिल्ह्यांमध्ये १२७ रुग्ण आढळून आले. करोना विषाणूचा संसर्ग हा अधिक चिंतेचा आणि गुंतागुंतीचा विषय झाल्याचा चिनी संशोधकांचा दावा आहे. त्याचदरम्यान नाताळ आणि नवीन वर्षानिमित्त सुट्ट्या असणाऱ्या होणारा प्रवास आणि हिवाळी ऑलिम्पिक खेळांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर चीनसमोर करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचं आव्हान आहे. फेब्रुवारी महिन्यात असणाऱ्या शीतकालीन खेळांसाठी जगभरातील वेगवेगळ्या देशांमधून खेळाडू चीनमध्ये दाखल होणार आहेत.
नक्की वाचा >> ओमायक्रॉनबाधितांवर या गोळ्यांचा वापर करुन केला जातोय उपचार; डॉक्टरांनीच दिली माहिती
निर्बंध निर्बंध आणि निर्बंध…
चीन सध्या डेल्टा आणि ओमायक्रॉनचा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पूर्ण तयारी करत असल्याचं चित्र दिसतं आहे. येथे लसीकरणाचा वेग वाढवण्यात आलाय. चीनचे उप पंतप्रधान सुन चुनलान यांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात असे आदेश दिलेत. चीननमधील प्रमुख नेत्यांपैकी एक असणाऱ्या चुनलान यांनी देशातील मुख्य शहरांमध्ये मोठ्या सभा आणि गर्दी जमण्यापासून रोखण्यासाठी तसेच प्रवासावर बंदी घालण्यासंदर्भातील निर्णयांवर जोर दिलाय.
नक्की वाचा >> लोकसत्ता विश्लेषण : ‘डेल्मिक्रॉन’ म्हणजे काय? तो किती घातक आहे?, भारतीयांना त्याचा धोका किती?
सर्व प्रयत्न करतोय चीन
शीआनमधील लॉकडाउन हा तेथे स्थानिक पातळीवर होत असणाऱ्या डेल्टा संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात आलाय. करोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे रोखून शून्य करोना रुग्ण आढळून येतील अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी चीन अगदी लसीकरण, निर्बंध आणि इतरही सर्व मार्गांनी प्रयत्न करत आहे.
नक्की वाचा >> लोकसत्ता विश्लेषण: करोनाविरुद्धच्या लढ्यात केंद्राने मंजूरी दिलेल्या Molnupiravir गोळीबद्दल जाणून घ्या
साध्य काय होणार?
शीआन शहरामधून देशभरामध्ये संसर्ग होण्याची शक्यता असल्याने या शहरामध्ये जाणाऱ्या आणि येणाऱ्या देशांतर्गत विमान सेवांवरही बंदी घालण्यात आल्याचं वृत्त चिनी प्रसारमाध्यमांनी दिलंय. अगदीच अत्यावश्यक कामासाठी शहराबाहेर जाण्यास परवानगी देण्यात आलीय. मात्र त्यासाठीही सरकारकडून विशेष परवाना जारी करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलंय.असे निर्बंध एका महिन्यासाठी लागू करण्यात आल्यानंतर करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची अनेक उदाहरणं चीनमध्ये आहेत. त्यामुळेच आता शीआनमधील संसर्ग रोखण्यासाठीही हाच मार्ग निवडण्यात आलाय.