चीनच्या अर्थव्यवस्थेलाही सध्या मंदीच्या ग्रहणाने ग्रासले आहे, मात्र असे असले तरीही चालू आर्थिक वर्षांत चीनी अर्थव्यवस्था साडेसात टक्क्य़ांची वृद्धी दर्शवेल, असा विश्वास चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी व्यक्त केला. मुख्य म्हणजे आर्थिक विकासाचा हा दर गाठण्यासाठी कोणत्याही ‘शासकीय मदती’ची गरज भासणार नाही, असा आत्मविश्वासपूर्ण दावाही केकियांग यांनी केला.
सन २००८-०९ या कालावधीत जागतिक अर्थमंदीच्या संकटामुळे अर्थव्यवस्थेस कृत्रिमरित्या चालना द्यावी लागली होती. त्या वेळी अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी ‘पॅकेज’ जाहीर करावी लागली होती. मात्र यंदा त्याची गरज भासणार नाही असा विश्वास पंतप्रधानांना असल्याचे ‘चायना डेली’ या दैनिकाने म्हटले आहे. चीनमधील अर्थतज्ज्ञ आणि कॉर्पोरेट अधिकाऱ्यांच्या बैठकीसमोर ली बोलत होते. आर्थिक निकषांमध्ये बदल तात्पुरत्या स्वरूपाचे असल्याने चीनला आपल्या धोरणांपासून फारकत घेण्याचे कारण नाही, असे ली म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनी अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने
* गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत चीनच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर दुहेरी आकडय़ांवरून साडेसात टक्क्य़ांवर
* अर्थव्यवस्थेला स्थैर्य देतानाच रोजगारजन्यता टिकविण्याचे आव्हान
* महागाईस आळा घालणे