गेल्या महिन्यात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने उत्तराखंडच्या बदाहोटी भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याच्या वृत्तामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच दुसरीकडे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी “सध्या आम्हाला याबाबत कोणतीही माहिती नाही”, असं सांगितलं आहे. मात्र, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि माजी राज्यपाल यांनी राज्याच्या सीमेवरील या घुसखोरीबाबत स्पष्ट भाष्य केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी लष्कराचे जवान यापूर्वी देखील चमोली जिल्ह्यातील बाराहोटी ‘नो-मॅन्स लँड’ भागात येत राहिले आहेत. परंतु, गेल्या महिन्यात खूपच मोठ्या संख्येने चिनी सैनिक तेथे फिरताना दिसले. हे चीनचं प्रक्षोभक कृत्य मानलं जात आहे.

नेमकं काय घडलं?

चमोली जिल्ह्यात पडणारा बदाहोटी हा एक गवताळ प्रदेश आहे. या भागात तिबेटीयन मेंढपाळांची देखील ये-जा राहिली आहे. १९६२ पूर्वीपर्यंत उत्तराखंडच्या धोरण घाटीचे मेंढपाळही येथे येत-जात होते. पण, त्यानंतर हे थांबलं. मात्र, आता गेल्या काही काळापासून चिनी सैनिक अनेक वेळा येथे दिसले आहेत. ते या भागात येतात, फिरतात, सिगारेट आणि इतर कोणतंही रॅपर फेकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्टच्या आसपास या भागात मोठ्या संख्येने चिनी सैनिक आले होते.

उत्तराखंड सरकार काय म्हणतं?

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना मंगळवारी याबाबत विचारलं असता त्यांनी याबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. सरकारचे वरिष्ठ अधिकारीही या विषयावर मौन बाळगून आहेत. हे प्रकरण दोन देशांच्या संबंधांशी निगडित असल्याने या प्रकरणी राज्य सरकार आणि अधिकारी अतिशय सावधगिरीने बोलत आहेत. मात्र, उत्तराखंडचे माजी राज्यपाल बी के जोशी आणि माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी बडाहोटी परिसरात चिनी घुसखोरीचा प्रयत्न होतं राहील असल्याचं रेकॉर्डवर म्हटलं आहे.

Story img Loader