सोलापूर : डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांनी चीनमध्ये दुसऱ्या महायुद्धात, अडचणीच्या काळात येऊन आरोग्य सेवा दिली. त्यांचे कार्य अतुलनीय आहे. चीन ते कधीही विसरणार नाही. त्यांचा मैत्रीचा वारसा पुढे नेण्यासाठी चीनचे वाणिज्य दूत (कौन्सिल जनरल) क्वांग झियान हुआ यांनी सोलापुरात डॉ. कोटणीस स्मारकाला सदिच्छा भेट दिली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्वांग झिंयान यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळात चीनचे कौन्सिलर ली मिंगमिग, वाँग अँग, झिओन्ग फैंगिझग आदी संबंधितांचा समावेश होता. पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. या वेळी पालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त विद्या पोळ आदी उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे, डॉ. राजेंद्र जाधव उपस्थित होते.  क्वांग झिंयान हुआ यांनी भैया चौकातील डॉ. कोटणीस स्मारकात दाखल झाल्यानंतर प्रथम तेथील डॉ. कोटणीस यांच्या पुतळय़ास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पालिका आयुक्त शिवशंकर यांनी डॉ. कोटणीस स्मारकासंदर्भात अधिक माहिती दिली. क्वांग झिंयान हुआ यांनी स्मारकातील वस्तू संग्रहालयातील सर्व छायाचित्रे पाहिली. त्यासंदर्भात माहिती घेतली व समाधान व्यक्त केले.

या प्रसंगी क्वांग झिंयान हुआ यांनी डॉ. कोटणीस स्मारकातील चीनचे माओ यांनी त्यावेळी पाठविलेले शोकसंदेश पत्र वाचले. दरम्यान, हे ऐतिहासिक ठेवा असलेले पत्र जतन व्हावे यासाठी चीनने पाच वर्षांपूर्वी काचेची जतन पेटी सोलापूरला पाठविली होती. मात्र, पुणे येथील एका एजन्सीकडे या जतन पेटीची चावी राहिली आहे. त्यामुळे ते पत्र या जतन पेटीत ठेवता येत नसल्याची बाब या वेळी समोर आली.