भारत चीन सीमेवरील घडामोडी थांबवण्याचे नाव घेत नाहीयेत, चीन विविध प्रकारे सीमेवरील तणाव कसा कायम राहील याच्या प्रयत्नात आहे. लडाख परिसरात सीमेवरील चीनी सैन्याच्या उपस्थितीमुळे कोणत्याही परिस्थितीचा सामना करावा लागेल या हेतूने भारतानेही सैन्य सीमेवर गेली दोन वर्ष सज्ज ठेवलं आहे. चीनच्या कुरापतीमध्ये आणखी एका प्रकाराची भर पडली आहे . चीनच्या हॅकर्सनी सीमेवरील वीज केंद्रांच्या ग्रीडवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर भारतात लडाख आणि परिसरातील वीज वितरण व्यवस्थेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न चीनच्या हॅकर्सनी केला आहे. याआधी चीनमधील RedEcho या नावाचा एक हॅकर्सच्या ग्रुपने अशीच घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. आता यावेळी TAG-38 नावाचा एका हॅकर्सच्या ग्रुपने ShadowPad नावाचे सॉफ्टवेअर वापरत ग्रीडमध्ये वापरत घुसखोरी करण्याचा प्रतय्न केला. अशी घुसखोरी करत राष्ट्रीय आप्तकालिन प्रतिसाद प्रणालीपर्यंत पोहचण्याचा, घुसखोरी करत माहिती मिळवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे.

यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पण यानिमित्ताने भारताविरोधात विविध प्रकारे पावलं उचलण्याचा प्रयत्न चीनकडून होत असल्याच पुन्हा एकदा समोर आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinese hackers have targeted the power sector in ladakh area asj