भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा धडाकाच चिनी लष्कराने लावला आहे. आता लडाख क्षेत्रातील देप्सांग खोऱ्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक असलेल्या भारतीय लष्कराच्या ठाण्यापासून अवघ्या दोन किमी अंतरापर्यंत चिनी सैनिकांनी घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे.
एप्रिलमध्ये देप्सांग खोऱ्यातच चिनी सैनिकांनी दौलतबेग ओल्डी या ठिकाणी घुसखोरी करत तब्बल तीन आठवडे मुक्काम ठोकला होता. अखेर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जपान दौऱ्याच्या निमित्ताने ही कोंडी फुटली होती. मात्र, या घटनेनंतरही चिनी सैनिकांनी लडाखपासून ३०० किमी अंतरावर असलेल्या चुमार क्षेत्रात घुसखोरी सुरूच ठेवली. १६ जुलैला ५० सैनिकांनी या ठिकाणी घुसखोरी केल्याचे नुकतेच उघड झाले. आता देप्सांग खोऱ्यातही १२ जुलै रोजी चिनी सैनिकांनी घुसखोरी केल्याचे उजेडात आले आहे. या ठिकाणी असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक बुत्र्से येथे भारतीय लष्कराचे ठाणे आहे. या ठाण्यापासून २  किमी अंतरा-पर्यंत चिनी सैन्य आले होते. लष्कराने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Story img Loader