चीनी सैन्याने पुन्हा एकदा लडाखमधील चुमार भागामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली. चीनीच्या या कृतीमुळे दोन्ही देशांतील संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे.
चुमार भागात भारताने लावलेले हाय रिझोल्यूशन कॅमेऱयांच्या वायर्स चीनी सैनिकांनी कापल्या. त्याचबरोबर येथे तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या छावण्याही त्यांनी उदध्वस्त केल्या. १७ जून रोजी चीनमधील पीपल्स लिबरेशन आर्मीने या भागामध्ये घुसखोरी करून तेथील वस्तूंची तोडफोड करण्यास सुरुवात केली, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. नियंत्रण रेषेपलीकडील चीनमधील स्थितीचे निरीक्षण करण्यासाठी या भागात कॅमेरे उभारण्यात आले होते. त्याच्या वायर्स कापण्यात आल्या आहेत. लेहपासून सुमारे ३०० किलोमीटरवर असलेल्या चुमार भागामध्ये चीनच्या बाजूने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर थेटपणे येण्यास मार्ग नाही. त्यामुळे आतापर्यंत चीनच्या दृष्टीने हा अतिशय संवेदनशील भाग राहिला आहे. एप्रिल महिन्यात याच भागातील दौलत बेग ओल्डी परिसरात चीनी सैनिकांनी घुसखोरी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा