बनावट ओळखपत्राच्या आधारे भारतात राहणाऱ्या एका चिनी महिलेला दिल्ली पोलिसांनी ‘मजनू का टिला’ परिसरातून अटक केली आहे. देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली असून हेरगिरी करण्यासाठीच ती भारतात आल्याचा संशय दिल्ली पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा – ७५ हजार युवकांना दिवाळीपूर्वी सरकारी नोकरी ; ‘रोजगार मेळाव्या’चे उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काई रुओ असे या महिलेचे नाव असून ती चीनच्या हैनान प्रांतातील रहिवासी आहे. ही महिला २०१९ मध्ये भारतात आली होती. तेव्हापासून ती दिल्लीत बौद्ध भिक्खुणी बनून राहत होती. दरम्यान, तिच्याकडून जप्त करण्यात आलेल्या ओळखपत्रावर डोलमा लामा असे नाव लिहिले असून त्यावर काठमांडूचा पत्ता दिलेला आहे.