चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना पदच्युत केल्याच्या अफवा इंटरनेटवर मुख्यत: सोशल मीडियावर पसरल्या आहेत. क्षी जिनपिंग समरकंदमध्ये शांघाय सहकार्य परिषदेसाठी (SCO) गेले असताना त्यांना कट रचून पदावरून हटवण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियामध्ये पसरले आहे.

यंदाचा चिनी हिवाळा जगाला तापदायक ठरणार…

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

या घटनेबाबत आंतरराष्ट्रीय माध्यमांनी अद्याप पुष्टी केलेली नाही. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या वृत्ताबाबत मौन बाळगले आहे. याबाबत चीनमधील माध्यमांनीही कुठलेही वृत्त प्रसारित केले नाही. मात्र, तरीही क्षी जिनपिंग यांना पदच्यूत केल्याचा अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. या अफवा क्षी जिनपिंग यांच्याविरोधात रचल्या गेलेल्या कटाचा भाग असल्याचा दावा काही संकेतस्थळांनी केला आहे. क्षी जिनपिंग यांना चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’मधून हटवण्यात आल्याचीही अफवा सोशल मीडियावर आहे.

आक्रमक चीनला ‘क्वाड’चा इशारा; हिंदू-प्रशांत क्षेत्राच्या स्थितीत एकतर्फी बदल नको

समरकंदमधील कार्यक्रमाची औपचारिक सांगता न करताच निघालेल्या जिनपिंग यांना बीजिंगमध्ये पोहोचताच अटक करण्यात आली असून त्यांना घरात स्थानबद्ध करण्यात आल्याचा दावा ट्विटरवर करण्यात आला आहे. बीजिंग विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत ६००० विमानांची उड्डाणं रद्द झाल्याचीही ट्विटर पोस्ट करण्यात आली आहे.

सुरक्षा परिषदेत एस. जयशंकर यांची चीनविरोधात कडक भूमिका, रशियावरही साधला निशाणा

चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या १६ ऑक्टोबरला नियोजित बैठकीत जिनपिंग तिसऱ्यांदा चीनच्या अध्यक्षपदासाठी दावा करण्याच्या तयारीत असतानाच त्यांच्याविरोधात या अफवा पसरल्या आहेत.

Story img Loader