लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात ‘एनडीए’मध्ये सामील झाले आहेत. याबाबतची घोषणा भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सोमवारी केली.
विशेष म्हणजे उद्या मंगळवारी (१८ जुलै) रोजी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीच्या एक दिवस आधीच चिराग पासवान हे ‘एनडीए’मध्ये सामील झाले. चिराग पासवान ‘एनडीए’मध्ये सामील झाल्यानंतर जेपी नड्डा यांनी ट्वीट करत त्यांचं स्वागत केलं.
तत्पूर्वी, रविवारी (१६ जुलै) चिराग पासवान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमधील यांच्या पक्षाचा वाटा निश्चित करण्यासंबंधित चर्चा झाली. २०१९ मध्ये चिराग पासवान यांचे वडील रामविलास पासवान यांच्या नेतृत्वाखालील अविभाजीत लोक जनशक्ती पक्षाने लोकसभेच्या सहा जागा लढवल्या होत्या. तसेच राज्यसभेची एक जागाही मिळवली होती. त्याप्रमाणे त्यांच्या पक्षाला वाटा मिळावा, अशी मागणी पासवान यांची आहे.
२०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाचे तत्कालीन मित्रपक्ष जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार यांच्या विरोधामुळे चिराग पासवान एनडीएमधून बाहेर पडले होते. त्यानंतर २०२२ मध्ये नितीश कुमार स्वत: ‘एनडीए’तून बाहेर पडले. त्यामुळे आता चिराग पासवान पुन्हा भाजपाबरोबर एनडीएमध्ये सामील झाले आहेत.