Chirag Paswan : मी कोणत्याही आघाडीत असलो, कोणतंही मंत्रिपद असलं तरी ज्या दिवशी असं वाटेल की संविधान आणि आरक्षणाशी खेळ होतो आहे त्यादिवशी मी मंत्रिपद सोडून देईन असं म्हटलं होतं. त्यानंतर चिराग पासवान मंत्रिमंडळातून बाहेर पडणार का? या चर्चा रंगल्या होत्या. आज त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.

चिराग पासवान काय म्हणाले होते?

संविधान आणि आरक्षणाशी खेळ होतो आहे असं वाटलं तर मी राजीनामा देईन असं वक्तव्य चिराग पासवान यांनी केलं होतं. तसंच पक्षाच्या स्थापनेच्या दिवशी म्हणजेच २८ नोव्हेंबरला गांधी मैदानावर मोठी रॅली काढण्यात येईल अशी घोषणाही चिराग पासवान यांनी केली. मी माझ्या वडिलांचे विचार पुढे घेऊन जात आहे. मी सिंहाचा छावा आहे, मी कुणापुढेही झुकणार नाही. मी कुणालाही घाबरत नाही असं चिराग पासवान ( Chirag Paswan ) म्हणाले होते.

हे पण वाचा Chirag Paswan : उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि काँग्रेसला नवं आव्हान; चिराग पासवान यांनी आखली मोठी योजना

चिराग पासवान आज काय म्हणाले?

माझं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नातं ज्यांना खटकतं त्यांना मी स्पष्ट सांगू इच्छितो जगातली कुठलीही ताकद मला पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून वेगळं करु शकत नाही. जे लोक मुंगेरीलालची स्वप्नं पाहात आहेत त्यांना ती पाहु द्या. मला माझ्या पंतप्रधानापासून वेगळं कुणीही करु शकणार नाही. तसंच एनडीए फुटणार, मी वेगळा होणार या सगळ्या चर्चा फोल आहेत. मी जे काही बोललो ते आमच्या पक्षाच्या लोकांना उद्देशून बोलत होतो. मी हेच सांगत होतो की मला सत्तेची लालसा नाही. सत्तेमुळे मी चुकीच्या निर्णयांना साथ देणार नाही. मी हे सांगत होतो, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार पुढे घेऊन जाणारे आहेत, मी आणि माझ्या पक्षाचे कार्यकर्ते समर्पण भावाने आमचं काम करत आहोत. जे लोक विचार करत आहेत की मी बाहेर पडेन काहीतरी घडेल ते तसं होणार नाही. असं चिराग पासवान ( Chirag Paswan ) म्हणाले.

लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान ( Chirag Paswan ) हे एनडीएतल्या पक्षांमधले आहेत. रामविलास पासवान यांचा वारसा यांचा वारसा मी पुढे घेऊन जातो आहे. माझ्या वडिलांनी कधीही सत्तेची लालसा ठेवली नाही. त्याचप्रमाणे माझ्याही मनात सत्तेची लालसा नाही असंही चिराग पासवान यांनी म्हटलं आहे. चिराग पासवान यांनी जे उत्तर दिलं आहे त्यामुळे ते एनडीए सोडणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.