राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ( NSE ) माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांना रविवारी सीबीआयने अटक केली आहे. त्यांनी हिमालयातील एका कथित योगीला गोपनीय माहिती पुरवत एनएसईचे कामकाज करून गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रा रामकृष्ण यांनी २०१३ ते २०१६ दरम्यान राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले होते. NSE चे माजी कर्मचारी आनंद सुब्रमण्यम यांच्या चौकशीच्या संदर्भात चित्रा रामकृष्ण सीबीआयच्या रडारवर आल्या होत्या.

विश्लेषण – चित्रा रामकृष्ण: एक झळाळती कारकीर्द काळवंडते तेव्हा…

कथित योगीशी संबंध काय?

गेली सुमारे वीस वर्षे चित्रा रामकृष्ण या महत्त्वाचे निर्णय घेताना हिमालयातील कथित योगीचा सल्ला घ्यायच्या, असा ठपका सेबीने ठेवला आहे. या कथित योगीच्या आदेशानुसार चित्रा यांनी एनएसईचे कामकाज केले. अर्थात, त्यांनी एनएसईच्या कामकाजाची गुप्त माहिती या योगीला पुरवल्याचा आरोप आहे. म्हणजेच या अज्ञात योगीने एनएसई चालवले आणि चित्रा रामकृष्ण या त्याच्या हातातील बाहुली ठरल्या होत्या. चित्रा रामकृष्ण आणि कथित योगीच्या संभाषणाचे काही ई-मेलही सेबीच्या हाती लागले आहेत. चित्रा रामकृष्ण यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आणि गोपनीय माहिती कथित योगीला पुरवल्याचे माहिती असूनही तत्कालीन संचालक मंडळाने चित्रा यांचा राजीनामा स्वीकारून त्यांना मोकळे रान का दिले, असा प्रश्न सेबीला पडला. त्यातूनच या प्रकरणाची व्याप्ती लक्षात येते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chitra ramakrishna arrested by cbi hrc