भारत आणि इटली यांच्यातील  हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात झालेल्या ३६ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आपले पथक इटलीला पाठवणार आहे. या व्यवहारातील मध्यस्थ  ग्युडो हॅचके हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून, त्याची चौकशी करण्यात येणार आहे.
संरक्षण मंत्रालयानेही त्यांचे पथक इटलीला पाठवले आहे. या पथकाचा अहवाल आल्यानंतर सीबीआय आपले पथक पाठवणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या पथकाला हॅचके कसा प्रतिसाद देतो हे पाहण्यात येणार आहे. सध्या मिलन येथील न्यायालयात हॅचकेविरोधात खटला सुरू आहे. या प्रकरणी सीबीआयने अनेकांवर आणि कंपन्यांवर गुन्हे नोंदवले आहेत. तत्कालीन हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी यांच्यावरही गुन्हय़ांची नोंद करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा