Salman Khan: अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात आता चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. या चार्जशीटमध्ये असलेल्या माहितीनुसार गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा लहान भाऊ अनमोल याने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सशी काय संवाद साधला होता ते समोर आलं आहे. या दोन्ही शूटर्सना हा संदेश देण्यात आला होता की असा गोळीबार झाला की सलमान खान ( Salman Khan ) घाबरला पाहिजे.

विक्की कुमार गुप्ता आणि सागर पाल या दोघांना अटक

सलमान खानच्या ( Salman Khan ) घराबाहेर गोळीबार करणाऱ्या सागर पाल आणि विक्की गुप्ता या दोघांना अटक करण्यात आली. या दोघांनी १४ एप्रिलच्या पहाटे सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला. या घटनेची विशेष चौकशी करण्यात आली. तपासा दरम्यान या दोघांना अटक करण्यात आली. त्यानंतर मोक्का न्यायलया समोर या प्रकरणातलं १७३५ पानांचं चार्जशीट दाखल करण्यात आलं. या प्रकरणात जी चार्जशीट दाखल करण्यात आली, त्यात एक ऑडिओ संभाषणही मिळालं आहे. हे संभाषण अनमोल बिश्नोई आणि शूटर विक्की गुप्ता यांच्यातलं आहे.

Baba Siddique Murder Case
Baba Siddique Case : तीन महिन्यांपूर्वी रचला कट, व्हिडीओ पाहून आरोपी शूट करायला शिकले; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
iran earthquake or nuclear attack
भूकंप की अणू चाचणी? इराणमधील रहस्यमयी भूकंपामागे नक्की काय?
Delhi Crime News
Delhi Crime News : धक्कादायक! दिल्लीत सिरीयन शरणार्थी आणि त्याच्या तान्ह्या बाळावर अ‍ॅसिड हल्ला
explosion that caused injuries and destroyed vehicles at outside the Karachi airport, Pakistan,
Blast in Pakistan : हल्ला की अपघात? पाकिस्तानच्या कराचीतील स्फोटात चिनी कामगारांचा मृत्यू; चीनच्या निवेदनात रोख कोणावर?
PM Modi visit Thane on Saturday Mahayutti office bearers defaced Ghodbunder with placards
पंतप्रधानांच्या सभेपूर्वी घोडबंदर विद्रुप, मोदी हेलेकाॅप्टरने येणार तरीही अतिउत्साही पदाधिकाऱ्यांची घोडबंदरभर फलकबाजी
Salil Ankola Former Indian Cricketer Mother Found Dead in Pune Flat Wound Marks Found on Neck
Salil Ankola: माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा संशयास्पद मृत्यू, गळ्यांवर जखमांच्या खूणा
Delhi Crime Doctor Shot dead in Hospital
Doctor Murder : “शेवटी २०२४ मध्ये हत्या केलीच”, डॉक्टरच्या हत्याप्रकरणी अल्पवयीन मुलगा गजाआड; सोशल मीडिया पोस्टही चर्चेत!

हे पण वाचा- “तुम्ही जेव्हा आई-वडील व्हाल…”, बॉलीवूडच्या भाईजानची अनंत-राधिकासाठी खास पोस्ट

सलमानच्या घरावर गोळीबार करण्याआधी बिश्नोई आणि शूटर्स यांच्यातलं संभाषण काय?

चार्जशीटमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, अनमोलने शूटर्सना सांगितलं एक मिनिटापेक्षा जास्त वेळ गोळीबार करा, गोळीबार इतका झाला पाहिजे की सलमानला ( Salman Khan ) भीती वाटली पाहिजे. तसंच अनमोलने विक्कीला विचारलं तू सिगारेट ओढतोस का? तो म्हणाल्यावर अनमोल म्हणाला ठीक आहे गोळीबार करताना सिगारेट ओढ, सीसीटीव्हीत तू सिगारेट ओढत गोळीबार करताना दिसशील याचा अर्थ असा लावला जाईल की तू एक निडर माणूस आहे. तुम्ही दोघांनी जर हे काम केलं तर तुम्ही इतिहास रचाल आणि तुमचं नाव मीडियात घेतलं जाई असंही बिश्नोईने या दोघांना सांगितलं. अशी माहिती चार्जशीटमध्ये आहे.

Salman Khan, High Court,
सलमान खान घराबाहेरील गोळीबाराचे प्रकरण, तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश (Photo: Varinder Chawla)

इतर तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत

सलमान खानच्या घरावर विक्की गुप्ता, सागर पाल यांच्यासह सोनू कुमार बिश्नोई, मोहम्मद रफीक चौधरी आणि हरपाल सिंग यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

१५ एप्रिलच्या रात्री दोन आरोपींना अटक

१४ एप्रिलच्या रविवारी पहाटे गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करून विकी गुप्ता (२४) आणि सागर पाल (२१) पसार झाले होते. हे दोघेही बिहारचे रहिवासी आहेत. त्यांना १५ एप्रिल रात्री उशिरा गुजरातमधील माता नो मध गावातून अटक करण्यात आली. यासंदर्भात पोलिसांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेच्यावेळी विकी गुप्ता दुचाकी चालवत होता आणि त्याच्या मागे बसलेल्या सागर पालने सलमानच्या घरावर गोळीबार केला.