दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (सीआयएसएफ) अधिकारी शहीद झाला आहे. जम्मू काश्मीरमध्ये हा हल्ला करण्यात आला. श्रीनगरमधील वागुरा नौगाम सेक्टरमध्ये अधिकारी सुरक्षेसाठी तैनात असताना दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला.

मिळालेल्या माहितीनुसार, सीआयएसएफ एएसआय राजेश कुमार यांनी वागुरा नौगाम सेक्टरमध्ये पॉवर ग्रीडच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलं होतं. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर ग्रेनेड हल्ला केला. हल्ल्यात राजेश कुमार शहीद झाले आहेत. दरम्यान जवान दहशतवाद्यांचा शोध घेत असून परिसर सील करण्यात आला आहे.

Story img Loader