Viral Video : कोळशाने भरलेल्या एका मालगाडीच्या इंजिनने एका केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) बोलेरो एसयूव्हीला धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजस्थानमधील एका मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर हा प्रकार घडला. सुरतगड सुपर थर्मल पॉवर प्लांट येथे हा सुरक्षा जवान गस्त घालत असताना ही घटना घडली. या घटनेत जवान थोडक्याच बचावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या दुर्घटनेत सीआयएसएफची एसयूव्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या संपूर्ण घटनोचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की सीआयएसएफची बोलेरो एसयूव्ही ही मानवरहित रेल्वे रूळ क्रॉसिंग ओलांडताना दिसत आहे. पण ही गाडी रेल्वे रुळावर गेल्यावर थांबतो आणि त्यामध्ये बसलेला चालक उतरून दूर पळतो, त्यानंतर काही क्षणातच मालगाडी या एसयूव्हीला जोरात धडक देते. यानंतर थर्मल प्लांटवर असलेले सीआयएसएफचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार हा अपघात झाला तेव्हा कोळशाने खच्च भरलेली रेल्वे ही थर्मल प्रोजेक्टकडे जात होती. तर सीआयएसएफची एसयूव्ही ही प्लांटमध्येच असलेली एक मानवरहित रेल्वे मार्ग क्रॉसिंग ओलांडत होती.

रेल्वेची गती कमी असल्याने आणि ड्रायव्हर ब्रेक लावत असल्याने इंजिन थांबले ज्यामुळे अधिक नुकसान झाले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी एसयूव्हीमध्ये सीआयएसएफचे सब-इन्स्पेक्टर, सुरक्षा कर्मचारी आणि चालक होते.

रेल्वे रुळांवर अडकलेली बोलेरो गाडी हायड्रा क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आली आणि रुळ पुढील वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.