Indian Airlines Bomb Threat : गेल्या काही दिवसांत विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या अनेक धमक्याच्या देण्यात आल्याचा घटना समोर आल्या आहेत. अशा प्रकारच्या धमक्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांत बॉम्बने विमान उडवण्याची धमकी देण्यात आल्याची जवळपास १२ वी घटना घटली. या अशा प्रकराच्या घटनांची केंद्र सरकारने आता गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी या घटनांवर प्रतिक्रिया देताना अशा प्रकारच्या विघ्नकारी कृत्यांबद्दल चिंता असल्याचं म्हणत या धमक्यांचा निषेध केला.

मंत्री राम मोहन नायडू यांनी बुधवारी या घटनांवर आता प्रतिक्रिया दिली. बुधवारी त्यांनी सांगितलं की, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी बॉम्बच्या धमकीच्या सर्व प्रकरणांचा सक्रियपणे तपास करत आहेत. तसेच सरकार देखील सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. गेल्या काही दिवसांत अनेक विमानांना बॉम्बच्या धमक्यांचा सामना करावा लागला आणि त्यानंतर या धमक्या खोट्या ठरल्या. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला अटक केली असल्याची माहिती मंत्री राम मोहन नायडू यांनी दिली.

हेही वाचा : पेट्रोलच्या टँकरचा अपघात, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड अन् अचानक झाला स्फोट; ९४ जणांचा मृत्यू, ५० जण गंभीर जखमी

दरम्यान, आज अकासा या विमान कंपनीचं विमान बंगळुरुला जाण्यासाठी निघालं होतं, पण ते नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर परतलं. विमानात बॉम्ब असल्याची धमकी आल्याने हे विमान दिल्लीला परतलं. मागच्या तीन दिवसांतली ही १२ वी धमकी (Bomb Threat) आहे. अकासा एअरलाईन्सच्या या विमानात १७४ प्रवासी बसले होते, त्यामध्ये तीन नवजात अर्भकं आणि सात क्रू मेंबर्सचाही समावेश होता.

त्याआधी मंगळवारी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या एका विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर ते विमान उत्तर प्रदेशातील महर्षि वाल्मिकी विमानतळावर या विमानाचे आप्तकालीन लँन्डिंग करण्यात आले होते. तर दुसरीकडे मंगळवारीच दिल्लीवरून शिकागोला जाणाऱ्या एका एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर दिल्लीवरून शिकागोला जाणाऱ्या विमानाचे कॅनडामध्ये आप्तकालीन लँन्डिंग करण्यात आले होते. दरम्यान, विमानात बॉम्ब असल्याच्या अशा प्रकारच्या धमक्यानंतर आता केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे.

आत्तापर्यंत कोणत्या विमानांना धमक्या आल्या?

जयपूर ते बंगळुरूमार्गे अयोध्या (IX765) एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट, दरभंगा ते मुंबई (SG११६) स्पाईसजेट फ्लाइट, बागडोगरा ते बंगळुरू (QP१३७३) आकाशा एअर फ्लाइट, दिल्ली ते शिकागो (AI १२७) एअर इंडियाचे फ्लाइट, दम्मम (सौदी अरेबिया) ते लखनौ (6E ९८) इंडिगो फ्लाइट, अलायन्स एअर अमृतसर-डेहराडून-दिल्ली फ्लाइट (९I ६५०) आणि एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट (IX ६८४) मदुराई ते सिंगापूर.