इराकच्या प्रांतिक राजधानीवर इसिसने कब्जा केल्यापासून रमाडीतून जवळपास ८५ हजार नागरिकांनी स्थलांतर केल्याचे वृत्त संयुक्त राष्ट्रसंघाने दिले आहे. इराकचे अधिकारी नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचण्यामध्ये अडथळे निर्माण करीत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
इसिसच्या जिहादींनी इराकच्या शहरावर कब्ज केला आहे. मे महिन्याच्या उत्तरार्धापासून जवळपास ८५ हजार नागरिकांनी रमाडीतून स्थलांतर केले आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्वासितांच्या संस्थेचे प्रवक्ते विल्यम स्पिण्डलर यांनी सांगितले. अद्यापि अनेक जणांची स्थलांतराची इच्छा असून त्यांना शोधण्याचा अनेक संघटना प्रयत्न करीत आहेत. बेबीलॉन आणि केरबाला प्रांत विस्थापितांसाठी बंद करण्यात आल्याचेही वृत्त आहे.

Story img Loader