जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. पूंछ जिल्ह्यात तीन नागरिक मृतावस्थेत आढळल्यामुळे त्या सोमवारी सुरनकोटला जाणार होत्या. त्यांनी तेथे जाऊ नये याकरता त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२१ डिसेंबर रोजी जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात दोन लष्करी वाहनांवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात चार जवान शहीद झाले होते. या हल्ल्यासंदर्भात चौकशीसाठी सुरक्षा दलांनी शुक्रवारी सकाळी आठ नागरिकांना ताब्यात घेतलं. या आठ नागरिकांपैकी तिघांचा टोपा पीर परिसरात मृतदेह आढळून आला.

हेही वाचा >> जम्मू-काश्मीरमध्ये मशिदीत नमाज पठण करत असलेल्या निवृत्त पोलिसाची दहशतवाद्यांकडून हत्या

“अतिरेक्यांच्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले, तीन निष्पाप नागरिकांचा लष्कराने कोठडीत छळ केला, अनेक जण अजूनही हॉस्पिटलमध्ये आपल्या जीवाशी झुंज देत आहेत आणि आता एक निवृत्त एसपी मारला गेला. भारत सरकारने सांगितलेली सामान्य स्थिती कायम ठेवण्यासाठी निष्पाप लोकांचा जीव जात आहे. एकीकडे कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणार्‍या लष्कराच्या पाच जवानांची हत्या आणि दुसरीकडे शत्रूपासून आमचे रक्षण करणार्‍यांनी अत्यंत रानटी रीतीने नागरिकांना मारलं. J&K मधील प्रत्येक जीवन धोक्यात आहे आणि ग्राऊंट रिअॅलिटीमुळे भारत सरकारच्या बनावट कथानकाला छेद मिळाला आहे”, असं मेहबुबा मुफ्ती यांनी एक्सवर म्हटलं होतं.

दरम्यान, याप्रकरणी घटनास्थळी मेहबुबा मुफ्की भेट देण्याकरता जाणार होत्या. परंतु, पोलिसांनी त्यांना अडवलं आणि त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Civilians killed in j ks poonch mehbooba mufti prevented from visiting site put under house arrest sgk