CJI Chandrachud Sings Dil Chahta Hai Song Andaaz Kyon Ho Puraana : भारताचे सरन्यायाधीश नेहमी न्यायालयात कठोर टिप्पण्या करताना दिसतात. परंतु, काही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा मोकळाढाकळा अंदाज देखील पाहायला मिळतो. सोमवारी (२३ सप्टेंबर) ते वेगळ्या रुपात दिसले. सोमवारी त्यांनी मुंबईच्या वांद्रे येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली. त्यांनी या कार्यक्रमावेळी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी सरन्यायाधीश आमीर खानच्या चित्रपटातील एक गाणं गुणगुणले. तसेच ते म्हणाले, “मुंबई उच्च न्यायालय बॉलिवूडच्या जरा जवळ आहे. त्यामुळे अचानक हे गाणं डोक्यात आलं”. ते यावेळी फरहान अख्तर दिग्दर्शित ‘दिल चाहता है’ चित्रपटातील ‘हम हैं नये, अंदाज क्यों हो पुराना?’ गाणं गुणगुणले.

उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजनावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, “एका बॉलिवूड चित्रपटातील गाणं माझ्या डोक्यात वाजलं. कदाचित मुंबई उच्च न्यायालय बॉलिवूडच्या थोडं जवळ असल्यामुळे तसं झालं असेल. ‘कोई कहे.. कहता रहे.. कितना भी हमको दिवाना… हम हैं नये, अंदाज क्यों हो पुराना?’ असे त्या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं मला आठवलं कारण आपण आज एक नवा अध्याय सुरू करत आहोत. आपण नवा दृष्टीकोन घेऊन वाटचाल करत आहोत. नव्या कल्पना आणि प्रगतीचा स्वीकार करताना आपण न्यायपालिकेतील आपल्या पूर्वजांची मूल्ये, त्यांनी घालून दिलेले आदर्श आणि समृद्ध वारसा घेऊन पुढे जाऊ”.

tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
suraj chavan shares reel video on riteish deshmukh ved song
रितेश देशमुखच्या सुपरहिट मराठी गाण्यावर सूरजचा जबरदस्त अंदाज! Video पाहून नेटकरी म्हणाले, “लय भारी…”
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”

हे ही वाचा >> कंगना रणौत यांच्या माफीनाम्यानंतर राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना इशारा; म्हणाले, “जर पुन्हा कृषी कायदे लागू करण्याचा प्रयत्न केला, तर…”

मुंबई उच्च न्यायालयाची नवी इमारत कशी असेल?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार, सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्ती व उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. उच्च न्यायालयाच्या नवीन इमरतीत मोठी कोर्टरूम, न्यायमूर्ती व नोंदणी कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या कचेऱ्या, मध्यस्थी केंद्र, एक मोठं सभागृह, ग्रंथालय, कर्मचारी, वकील व वादी-प्रतिवाद्यांसाठी अनेक सुविधा असतील.

हे ही वाचा >> Woman Chef Shares Experience: “नरकात तुमचं स्वागत आहे…”, बंगळुरूतील शेफनं सांगितला कामाच्या ठिकाणचा धक्कादायक अनुभव!

मुंबई उच्च न्यायालयाचा विस्तार

राज्य सरकार उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीच्या परिसरातील ३०.१६ एकर जागा देणार आहे. ही जागा टप्प्याटप्प्याने उच्च न्यायालयाला सुपूर्द केली जाईल. पहिल्या टप्प्यात ४.३९ एकर जमीन देण्यात आली आहे. १६ ऑगस्ट १८६२ रोजी स्थापन करण्यात आलेलं मुंबई उच्च न्यायालय सध्या फ्लोरा फाउंटनजवळच्या (हुतात्मा चौक) इमारतीत आहे. आता या न्यायालयाचा विस्तार केला जात आहे.