अनेकदा सर्वोच्च न्यायालयात जेव्हा विविध गोष्टींची सुनावणी सुरु असते तेव्हा अशा काही घटना घडतात ज्याची चर्चा देशभरात होते. आपल्या देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड हे वकिलावर चिडले होते आणि त्याची कानउघाडणी केल्यानंतर वकिलाला सरन्यायाधीशांनी घटनापीठ आणि त्यांच्याकडे असलेली प्रकरणं याचं महत्व समजावून सांगितलं. एका वकिलाने सरन्यायाधीश चंद्रचूड यांना ईमेल केला. त्यात त्याने हा उल्लेख केला की घटनापीठाकडे जी प्रकरणं आहेत त्यात वेळ वाया जातो आहे, त्यामुळे सामान्य माणसांचे खटले प्रलंबित राहात आहेत असंही या वकिलाने म्हटलं होतं. त्याच्यावर चंद्रचूड चिडले होते.
चंद्रचूड नेमके का चिडले?
शु्क्रवारी एका सुनावणीच्या दरम्यान वकील मैथ्यू नेदुम्परा यांच्या ईमेलवर चंद्रचूड यांनी प्रश्न उपस्थित केले. मैथ्यू यांनी सुप्रीम कोर्टाचे जनरल यांना एक ई मेल पाठवला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की घटना पीठाने त्यांच्याकडे असलेले खटले आणि प्रकरणं ऐकत बसायला नको. कारण त्यात वेळ वाया जातो आहे. त्यामुळे सामान्य माणसांच्या प्रकरणांची सुनावणी होत नाही. त्यावर चंद्रचूड म्हणाले की यावर मला वाटतं की बहुदा मॅथ्यू हे घटनापीठाकडे काय प्रकरणं आहेत याबाबत अनभिज्ञ आहेत. एनडीटीव्हीने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
घटनापीठाकडे LMV लायसन्स संदर्भात एक प्रकरण आलं होतं. त्याचा परिणाम थेट हजारो चालकांवर होणारा आहे. घटनापीठाकडे अशी प्रकरणं नसतात ज्याचा परिणाम सामान्य माणसांच्या आयुष्यावर होणार नाही. अनुच्छेद ३७० बाबत घटनापीठाने देशाच्या लोकांचं म्हणणं ऐकलं होतं. अनुच्छेद ३७० बाबत आम्ही पाठिंबा देणारं म्हणणं आणि विरोधातलं म्हणणं असं दोन्ही ऐकलं होतं असंही चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. असं म्हणत घटनापीठाचं महत्व वकील मॅथ्यू यांना समजावलं.