Dhananjay Chandrachud Verbal Fight: देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी गेल्या दीड वर्षांत अनेक महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी घेतली आहे. यात महाराष्ट्रातील राजकीय खटल्यांचाही समावेश होता. धनंजय चंद्रचूड हे जसे त्यांच्या खटल्यांमुळे चर्चेत असतात तसेच ते त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावासाठीही ओळखले जातात. त्यांच्या याच स्वभावाचा अनुभव नुकताच सर्वोच्च न्यायालयातील वकील मॅथ्यूज नेदुमपरा यांना आला. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी NEET-UG परीक्षेबाबत सुनावणी चालू असताना घडलेला हा प्रसंग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

नेमकं काय घडलं आज सर्वोच्च न्यायालयात?

बार अँड बेंचनं यासंदर्भात त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. यात आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड व वकील मॅथ्यूज नेदुमपरा यांच्यातील संवाद नमूद करण्यात आले आहेत. नीट परीक्षेसंदर्भातील सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांचे वकील हूडा हे युक्तिवाद करत होते. त्यावेळी त्यांना मध्येच थांबवून वकील मॅथ्यूज नेदुमपरा यांनी “मला काहीतरी बोलायचं आहे” असं म्हणून हुडा यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.

Yuvraj Singh father Yograj Controversial Statement About MS Dhoni
Yograj Singh on MS Dhoni : ‘धोनीने आरशात तोंड पाहावे…’, योगराज सिंगांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, ‘युवराजला भारतरत्न द्यावा…’
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
two teachers booked for sexually harassing minor student
Sexually Assaulted Minor Girl : अल्पवयीन मुलीला खोलीवर बोलावले आणि दोन शिक्षकांनी….
Dy Chandrachud on Kolkata Doctor Case Hearing
Kolkata Doctor Case Hearing: ‘सरकारी रुग्णालयात मला जमिनीवर झोपावं लागलं’, सरन्यायाधीश चंद्रचूड डॉक्टरांना काय म्हणाले?
Dharmendra
जावेद अख्तर यांच्याशी ‘तसं’ वागण्याचा धर्मेंद्र यांना आजही पश्चात्ताप; म्हणाले, “मला आश्चर्य वाटते…”
CM Eknath Shinde on Badlapur News
Badlapur School Case: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आरोपीला…”
Devendra fadnavis marathi news
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले; म्हणाले, “नालायकांनो पंधराशे रुपयात…”
Kolkata doctor rape murder case
Mamata Banerjee : कोलकाता बलात्कार प्रकरणी ममता बॅनर्जींचा पोलिसांना अल्टीमेटम; म्हणाल्या, “रविवारपर्यंत प्रकरण निकाली काढा, अन्यथा…”

मॅथ्यूज नेदुमपरा यांनी केलेल्या मागणीवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी हुडा यांच्यानंतर तुम्हाला बोलायची संधी देतो, असं सांगितलं. पण त्यावर मॅथ्यूज नेदुमपरा यांचं समाधान झालं नाही. त्यांनी उलट सरन्यायाधीशांनाच विरोध करत “मी इथे सर्वात ज्येष्ठ आहे, मला बोलायची संधी मिळायला हवी”, असं म्हणून वादाला सुरुवात केली.

…आणि सरन्यायाधीश भडकले!

वकील मॅथ्यूज नेदुमपरा यांचा वाद ऐकून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड चांगलेच भडकले. त्यांनी मॅथ्यूज नेदुमपरा यांना सुनावलं. “मी तुम्हाला ताकीद देतोय. तुम्ही हा असा संवाद करू शकत नाही. मी या कोर्टाचा इनचार्ज आहे”, असं सरन्यायाधीश म्हणाले. एवढंच नव्हे, तर त्यांनी थेट सुरक्षा अधिकाऱ्यांना आदेश दिले. “सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलवा आणि यांना बाहेर काढा”, असं सरन्यायाधीश म्हणाले.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी देशवासीयांना केलं आश्वस्त; म्हणाले, “आम्ही पूर्णवेळ…”

यावर मॅथ्यूज नेदुमपरा यांनी “मी जातोच आहे, मला अशा प्रकारे तुम्ही बाहेर काढण्याची आवश्यकता नाही”, असं विधान केलं. त्यावर पुन्हा सरन्यायाधीश संतापले. “तुम्ही हे असं बोलण्याची गरज नाही. तुम्ही जाऊ शकता. मी गेल्या २४ वर्षांपासून न्यायव्यवस्था पाहतोय. मी अशा प्रकारे वकिलांना या कोर्टात कामकाज कसं व्हायला हवं हे ठरवू देऊ शकत नाही”, असं न्यायमूर्ती म्हणाले. त्यावर प्रत्युत्तर म्हणून पुन्हा मॅथ्यूज नेदुमपरा यांनी “मी १९७९ पासून न्यायप्रक्रिया पाहतोय”, असं म्हटलं.

“मला तुमच्याविरोधात कठोर पाऊल उचलावं लागू शकतं”

या घडामोडींनंतर मात्र सरन्यायाधीशांनी मॅथ्यूज नेदुमपरा यांना शेवटचा इशारा दिला. “मला कदाचित तुमच्याविरोधात असे काही आदेश द्यावे लागू शकतात, जे तुमच्यासाठी रास्त ठरणार नाहीत”, असं धनंजय चंद्रचूड म्हणाले. त्यावर केंद्र सरकारचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनीही “हे न्यायालयाचा अवमान करणारं आहे”, अशी प्रतिक्रिया दिली. शेवटी नेदुमपरा यांनी “मी जातोय”, असं म्हणून न्यायालयातून बाहेरचा रस्ता धरला.