कर्नाटकमध्ये शिवमोगा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि टिपू सुलतान यांचे फलक लावण्यावरून वाद आणि हल्ला प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. यातील दोघांची ओळख पटली असून नदीम (२५) आणि अब्दुल रहमान (२५) अशी त्यांची नावे आहेत. स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) दोन गटांत हा वाद झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरण : जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ दोषींची सुटका

मिळालेल्या माहितीनुसार स्वातंत्र्यदिनानिमित्त कर्नाटकमधील शिवमोगा येथील अमीर अहमद सर्कल परिसरात स्वातंत्र्यवीर सावकर यांचे पोस्टर लावण्यावरून वाद झाला होता. या वादाच्या काही तासानंतर प्रेमसिंग नावाच्या एका व्यक्तीवर गांधी बाजार परिसरात चाकूने हल्ला करण्यात आला. यामध्ये ही व्यक्ती जखमी झाली होती. या घटनेनंतर येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा >> स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या फलकास आक्षेप, शिवमोगात तणाव ; एकावर शस्त्राने हल्ला, संचारबंदीचे आदेश

पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला आसून एकूण चार आरोपींना अटक केली आहे. यातील दोघांची नावे नदीम आणि अब्दुल रहमान अशी आहेत. घटनेनंतर पोलिसांनी या परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून येथील जिल्हाधिकारी आर सेल्वामणी यांनी शिवमोगा शहर तसेच भद्रावती शहर परिसरातील शाळा मंगळवारी (१६ ऑगस्ट) बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clash over veer savarkar poster 4 arrested for stabbing man in karnataka shivamogga prd