पीटीआय, इस्लामाबाद

पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या आठवड्यात आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष होऊन एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर १०० पेक्षा अधिक जण जखमी झाले. जखमींमध्ये बहुसंख्य पोलिसांचा समावेश आहे. पाकिस्तानातील माध्यमांनी रविवारी यासंबंधीचे वृत्त दिले आहे. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी सोमवारी आपात्कालीन बैठक बोलावली आहे.

मिरपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक कामरान अली यांनी डॉनला सांगितले की, ‘जम्मू काश्मीर जॉइंट अवामी अॅक्शन कमिटी’ने (जेएएसी) शनिवारी पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली आणि पूंछ जिल्ह्याचा पाकव्याप्त काश्मीरमधील भाग, येथून मुझफ्फराबादला मोर्चा आयोजित केला होता. तसेच शुक्रवारी चक्काजाम आणि बंदचेही आवाहन केले होते. ‘जेएएसी’ ही पाकव्याप्त काश्-मीरमधील व्यापाऱ्यांची प्रमुख संघटना आहे. प्रदेशात होणाऱ्या जलविद्याुत ऊर्जेच्या प्रमाणात विजेचा पुरवठा करण्यात यावा, गव्हाच्या पीठावर अनुदान द्यावे आणि उच्चभ्रू वर्गाचे विशेषाधिकार बंद करावेत या त्यांच्या मुख्य मागण्या होत्या. मोर्चापूर्वी बुधवारी आणि गुरुवारी मुझफ्फराबाद आणि मिरपूरमध्ये ‘जेएएसी’च्या जवळपास ७० कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली, तसेच त्यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले.

हेही वाचा >>>‘मॅगी’सह भात खाल्ल्यानंतर १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू, कुटुंबातील इतरांनाही विषबाधा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकव्याप्त काश्मीरच्या प्रशासनाने मोर्चा थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निमलष्करी दल आणि पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. जेएएसीचा मुझफ्फराबादकडे जाणारा मोर्चा थांबवण्यासाठी प्रयत्न करणारे पोलीस आणि कार्यकर्त्यांदरम्यान संघर्ष झाला. त्यादरम्यान, इस्लामगढ येथे निदर्शकांनी केलेल्या गोळीबारात छातीला गोळी लागून पोलीस उपनिरीक्षक अदनान कुरेशी यांचा मृत्यू झाला. तसेच अनेक पोलीस जखमी झाले.

Story img Loader