Class 10 student dies in clash over farewell party Crime News : केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात एका १५ वर्षीय दहावीच्या विद्यार्थाचा इतर विद्यार्थ्यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी सकाळी शाळेतील फेअरवेल पार्टीमध्ये झालेल्या वादानंतर पीडिता विद्यार्थ्यावर इतर विद्यार्थ्यांनी हल्ला केला होता, ज्यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एलेटिल येथील एमजे उच्च माध्यमिक शाळेत शिकणारा मुहम्मद शहाबास गुरूवारी थामरासेरी येथील एका खाजगी ट्यूशन सेंटरबाहेर झालेल्या विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारीत जखमी झाला होता. नंतर कोझिकोड येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात त्याचे निधन झाले. कोझिकोड ग्रामीणचे एसपी के. इ. बैजू यांनी सांगितले की या प्रकरणी ५ दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस काय म्हणाले?

त्यांनी सांगितले की, ” या घटनेनंतर पाच विद्यार्थ्यांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले, येथे त्यांना त्यांच्या पालकांबरोबर जाण्याची परवानगी देण्यात आली. पीडित विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर पुर्वीचे आरोप खूनाच्या आरोपात बदलण्यात आले. तसेच पालकांना या विद्यार्थ्यांना पुन्हा बाल न्याय मंडळासमोर हजर करावे असे सांगण्यात आले,” असे एसपी बैजू म्हणाले.

आम्ही इतर अजून विद्यार्थ्यांच्या सहभागाचा तपास करत आहोत. व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मॅसेजवरून दिसून येत आहे की, इतर अनेक विद्यार्थ्यांना या घटनेबद्दल माहिती होती. या सर्वांचा आरोपींच्या यादीमध्ये समावेश केला जाईल. यामध्ये कोणी वयस्क व्यक्ती या हल्ल्यामागे आहे का याचा देखील शोध घेतला जात आहे, असेही एसपी बैजू म्हणाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही शाळेतील विद्यार्थी या ट्यूशन सेंटरमध्ये क्लासेस घेत होते. गेल्या रविवारी विद्यार्थानी १०वीच्या परीक्षा ३ मार्चपासून सुरू होत असल्याने निरोप संमारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात एमजे उच्च माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी डान्स सादर केला होता. यावेळी सरकारी वोकेशनल उच्च माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यांची टर उडवली. ज्याचा बदला घेण्याचा विद्यार्थ्यानी निर्णय घेतला.

धक्कादायक माहिती आली समोर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जास्त विद्यार्थ्यांना गोळा करण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप सुरू करण्यात आला आला आणि गुरूवारी याच ट्यूशन सेंटरच्या बाहेर दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. या राड्याचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. शाहबास त्याच्या घरी असताना त्याला त्याचा मित्र या घटनास्थळी घेऊन गेला. जेथे त्याला हाणामारीत गंभीर दुखापत झाली आणि तशाच अवस्थेत त्याला त्याच्या घराजवळ सोडून देण्यात आलं. गुरूवारी रात्री त्याला स्थानिक रुग्णालया दाखल करण्यात आलं जेथून त्याला कोडिकोड येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या ग्रुपमधील काही व्हाईस मेसेज लीक झाले होते ज्यामध्ये हे विद्यार्थी या हल्लाबद्दल आनंद व्यक्त करताना दिसून आले होते. या घटनेनंतर राज्याचे शिक्षणमंत्री व्ही शिवांकुट्टी यांनी शिक्षण विभाग मुलाच्या मृत्यूची चौकशी करेल असे म्हटले आहे.